Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon

Agriculture Technology : नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या निधीत गैरव्यवहाराचा संशय

देशाच्या निती आयोगाने राज्याच्या शेतीमधील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापराकरिता पाठविलेल्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.

पुणे ः देशाच्या निती आयोगाने (Niti Ayog) राज्याच्या शेतीमधील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान (New Agriculture Technology) वापराकरिता पाठविलेल्या निधीत गैरव्यवहार (Fund Malpractice) झाल्याचा संशय आहे. त्याबाबत खुद्द केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीच चौकशीची लेखी मागणी केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गडकरी यांनी नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांना लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे निती आयोगाची धावपळ उडाली आहे. आयोगाच्या निधीतून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील प्रकल्प संचालकांच्या (आत्मा) नियंत्रणाखाली राबविलेल्या यांत्रिकीकरणाच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.

Nitin Gadkari
Zero Tillage Technology: शून्य मशागतीचे फायदे काय आहेत ?

वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निती आयोगाने पाठवलेल्या निधीचा वापर योग्य पद्धतीने झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शेतकरी सचिन कुलकर्णी यांनी केली आहे. आयोगाने २०२१-२२ मध्ये साडेचार कोटी रुपये पाठवले होते. वाशीम जिल्हा आत्महत्याप्रवण क्षेत्रात मोडतो. शेती क्षेत्रातील विविध समस्यांमुळे तेथील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत,” अशी आठवण गडकरी यांनी निती आयोगाला करून दिली आहे.

Nitin Gadkari
Agriculture Technology : आयओटी ही काय भानगड आहे?

निती आयोगाने वाशीम जिल्ह्यात पाठवलेल्या निधीच्या वापराबाबत संशय निर्माण झालेला आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची नावे, पत्ते, संपर्क क्रमांक याची यादी जाहीर करायला हवी. आयोगाच्या निधीतून या शेतकऱ्यांना नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या कृषी अवजारे व यंत्रांचा पुरवठा करण्यात आला, हे स्पष्ट झालेले नाही. योजना राबविताना लाभार्थींची निवड करण्याची प्रक्रिया योग्य नव्हती. या योजनेबाबत जनतेत विश्‍वास येण्यासाठी पारदर्शकता आणण्याची गरज आहे. त्यामुळे या तक्रारीबाबत आपण खात्री करावी आणि कारवाईसाठी दखल घ्यावी, असेही या पत्रात गडकरी यांनी सुचविले आहे.

प्रकरणाचा अभ्यास सुरू

मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रामुळे नीती आयोगाने चौकशीला सुरूवात केली आहे. आयोगाच्या उपाध्यक्षांनी गडकरी यांना पत्र लिहून आम्ही या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत, असे कळविले आहे. दरम्यान, आयोगाने राज्य शासनाकडूनही या प्रकरणाची माहिती मागविल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com