अध्यक्ष, संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची ‘स्वाभिमानी’ची मागणी

मागील हंगामात जाहीर केलेल्‍या ऊसदरात कपात करून करोडो रुपयांची बुडवणूक केली आहे.
'ऊसदर पेमेंटबाबत गुन्हे दाखल करा'
'ऊसदर पेमेंटबाबत गुन्हे दाखल करा'Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

सातारा : मागील हंगामात जाहीर केलेल्‍या ऊसदरात (Sugarcane rate) कपात करून करोडो रुपयांची बुडवणूक केली आहे. शेतकऱ्यांवर दरोडा घालून, ऊसदर नियंत्रण कायद्याचा भंग करून १५ टक्के व्याज बुडवून कारखानदारांनी गुन्हा केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखानदार व अध्यक्ष, संचालक यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तसेच, संघटनेच्या मागणीवर निर्णय होत नाही, तोपर्यंत साखर कारखान्यांना यावर्षीचा गाळप परवाना देण्यात येऊ नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

'ऊसदर पेमेंटबाबत गुन्हे दाखल करा'
Smart Cotton Project : स्मार्ट कॉटन प्रकल्पातून होणार कापसाचे मूल्यवर्धन

यासंदर्भात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की गेल्या ऊस गळीत हंगामात जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी पूर्वनियोजित कट करून ऊस बिलाचे तुकडे केले. तसेच सुरुवातीला फक्त २६०० रुपये टनाला बिल अदा केले.

'ऊसदर पेमेंटबाबत गुन्हे दाखल करा'
Soybean Rate : सोयाबीनचे वाढलेले दर टिकतील का?

उर्वरित बिलाचे बेकायदेशीर तुकडे करत आठ ते नऊ महिने शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे अडवून ठेवून बिनव्याजी वापरले. या वेळी राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, संजय जाधव, ॲड. विजय चव्हाण, हेमंत खरात, महादेव डोंगरे, जनार्दन आवारे, गणेश कदम, राजू घाडगे, उमेश घाडगे, रणजित बागल आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com