नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदतीची ‘स्वाभिमानी’ची मागणी

या वर्षी सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत.
Crop Damage
Crop DamageAgrowon

संग्रामपूर, जि. बुलडाणा ः जिल्ह्यात ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करून विनाविलंब शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई (Financial Assistance To Farmer) द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatana) मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. येथील तहसीलदारांमार्फत निवेदन पाठवले असून, ३० जुलैला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Crop Damage
राज्यात पीक नुकसान ४५ लाख हेक्टरच्या पुढे

या वर्षी सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. पिके नष्ट झाली आहेत. कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद, मका, ज्वारी, तूर इत्यादी पिके खराब झाली असून संग्रामपूर, कवठळ, पातुर्डा या तीन महसूल मंडळांत १७ व १८ जुलै रोजी अतिवृष्टी झाली.

पिके खरडून गेली. अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या हवालदिल झाला आहे. त्याकरिता संग्रामपूर तालुक्यासंह संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून विनाविलंब शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना मदत देण्यास शासन प्रशासनाकडून दिरंगाई झाल्यास स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात ३० जुलैला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या वेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अनंता मानकर, विजय ठाकरे, राजेश उमाळे, सुपडा सोनोने, गणेश माळोकार, अनुप देशमुख, देवा आगरकर, शकर तेल्हारकर, सागर येनकर, संतोष म्हसाळ, डाॅ. विनोद बंद, नारायण कुरवाडे यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com