Raju Shetty : ‘स्वाभिमानी’चा बुधवारी राज्यव्यापी ‘चक्का जाम : राजू शेट्टी

ऊस वाहतूकदारांच्या प्रश्‍नांकडे वेधणार शासनाचे लक्ष
Raju Shetty
Raju Shetty Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : ऊसतोडणी मुकादमांकडून ऊस वाहतूकदारांची होणारी फसवणूक, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे थकलेले अनुदान (Subsidy) , यासह विविध प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (ता. २२) राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी पत्रकार परिषदेत केली.


दरम्यान, बारावीच्या परीक्षा असल्याने हे आंदोलन दुपारी बारा वाजता होईल, त्यात राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन होणार नाही.

तालुक्याच्या पातळीवरील राज्य व प्रमुख जिल्हा मार्ग रोखून धरले जातील, अशी माहिती श्री. शेट्टी यांनी दिली.

शेट्टी म्हणाले, ‘‘ऊसतोडणी वाहतूकदरांचा प्रश्‍न जटिल बनला आहे. राज्यात ऊस उत्पादन आणि साखर कारखाने आणि त्यांची गाळप क्षमताही वाढली आहे; पण तोडणी मजुरांची संख्या मात्र कमी होत आहे.

याचा फायदा घेऊन तोडणी मुकादमांकडून वाहतूकदारांची मोठी फसवणूक झाली आहे. साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २२ जिल्ह्यांतील ४४६ कोटी रुपयांची मुकादमांनी फसवणूक केली आहे.

याशिवाय नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान, सदोष वीजबिल दुरुस्त करून देणे, वीज नियामक मंडळाची प्रस्तावित ३७ टक्के वीज वाढ रद्द करावी,

आदी मागण्याही करण्यात येणार आहेत.’’ या वेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.

Raju Shetty
Raju Shetty : राजू शेट्टी यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट

स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेची स्थापना राज्य पातळीवरील स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेची स्थापना करण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी या वेळी सांगितले.

या संघटनेमार्फत ऊसतोडणी कल्याण महामंडळाकडून आता मजुरांची नोंदणी करून कारखान्यांना मजूर पुरवावेत, वाहतूकदारांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करताना स्थानिक पोलिसांनी सखोल चौकशी करावी,

टोळ्या पळालेल्या वाहतूकदारांच्या मागचा बँकेचा ससेमिरा कमी करावा, हे कर्ज फेडण्यासाठी पाच वर्षांची मुदत द्यावी, आदी मागण्या करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.


Raju Shetty
Raju Shetty : राजू शेट्टी यांचा शेतकऱ्यांनी केला सत्कार

‘कमळ’ टिकणार नाही ः शेट्टी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले असले, तरी आमच्याकडेही तणनाशक आहे. त्यावर ‘कमळ’ टिकणार नाही, असा इशाराही श्री. शेट्टी यांनी दिला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com