Buldana Farmer Protest : अक्षय्य तृतीयलाच स्वाभिमानीने घातलं सरकारचं श्राध्द

अक्षय्य तृतीया सणाच्या दिवशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला हार घालून श्राध्द घालत आंदोलन करण्यात आले आहे.
Farmer Protest
Farmer Protest Agrowon

Buldana News ऐन अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) सणाच्या दिवशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांच्या फोटोला हार घालून श्राध्द घालत आंदोलन करण्यात आले आहे.

शासकीय हरभरा खरेदी (Chana Procurement) केंद्रे सुरू करणे तसेच उन्हाळी कांद्याला अनुदान (Onion Subsidy) देण्याची मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी संग्रामपूर तहसील कार्यालयाच्या आवारात अनोखे आंदोलन केले आहे.

राज्यामध्ये अनेक अवकाळी पावासामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही कोणतीच मदत मिळाली नाही, असा आरोप करत स्वाभिमानीने बुलडाण्यात साडेतीन मुहूर्तांपैकी एकी असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच आंदोलन केले आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत आणि पीकविमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणही यावेळी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केली.

Farmer Protest
Onion Subsidy : कांदा अनुदानासाठी अर्जांना ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

अवकाळी पावसामुळे आधिच शेतीपिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशावेळी सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

तसेच शासकीय हरभरा खरेदी केंद्रे सुरू करावीत, उन्हाळी कांद्याला अनुदान द्यावे आणि अतिवृष्टी आणि पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशा मागण्या करत हे आंदोलन करण्यात आले.

Farmer Protest
Chana Procurement : अकोल्यातही ‘नाफेड’ची हरभऱ्याची खरेदी बंद

सरकारने नव्याने शासन निर्णय काढुन विदर्भातील उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावी. परंतु सरकारने कांद्याला अनुदान व हरभरा खरेदी केंद्रे सुरू न केल्यास विधानभवनासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानीचे डिक्कर यांनी सरकारला दिला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सुबुद्धी मिळो म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज संग्रामपूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सरकारचे श्राध्द घालून आंदोलन केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला घालून टरबूज , कांदा व इतर मिष्ठांन्नासह पान पुजन करून सरकारचे श्राध्द घालण्याचे प्रतिकात्मक आंदोलन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com