Sugarcane Harvesting : सांगलीत ‘स्वाभिमानी’ने ऊसतोडी केल्या बंद

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गुरुवारी (ता. १७) आणि शुक्रवारी (ता. १८) ऊसतोड बंद आंदोलनाची हाक दिली. जिल्‍ह्यात काही ठिकाणी ऊसतोड सुरू असल्याने गांधीगिरी पद्धतीने ऊसतोड बंद करण्यात आली.
Sugarcane Harvesting
Sugarcane HarvestingAgrowon

सांगली ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गुरुवारी (ता. १७) आणि शुक्रवारी (ता. १८) ऊसतोड बंद आंदोलनाची (Sugarcane Harvesting Stopped Agitation) हाक दिली. जिल्‍ह्यात काही ठिकाणी ऊसतोड सुरू असल्याने गांधीगिरी पद्धतीने ऊसतोड (Sugarcane Harvest) बंद करण्यात आली.

Sugarcane Harvesting
Sugarcane Management : पूर्वहंगामी ऊसासाठी खत, पाणी व्यवस्थापन

या वेळी खानापूर तालुक्यातील उदगिरी आणि पलूस तालुक्यातील क्रांती साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धडक दिली. शिवारातील ऊस तोडी बंद केल्या. ऊस वाहतूक करणारा ट्रॅकटर रोखून गांधीगिरी पद्धतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निदर्शने करत आंदोलन केले. शुक्रवारी (ता. १८) कारखाने बंद ठेवण्याचा इशारा दिला असून ऊस वाहतूक आढळून आल्यास पेटवून देऊ, असा इशारा संघटनेचे दिला आहे.

Sugarcane Harvesting
Sugarcane Season : पुणे विभागात चोवीस साखर कारखाने सुरू

एकरकमी ‘एफआरपी’ मिळाली पाहिजे, तीन टप्प्यात ‘एफआरपी’ देण्याचा राज्य शासनाने केलेला कायदा रद्द करावा, वजन काटे ऑनलाइन झाले पाहिजेत, रिकव्हरीतील चोरी थांबली पाहिजे, तोडीला द्यावे लागणारे पैसे बंद झाले पाहिजेत आदींसह विविघ मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी’ने दोन दिवस ऊस तोड बंद आंदोलन पुकारले आहे.

वाळवा तालुक्यातील हुतात्मा सहकारी साखर कारखान्याकडे वाहतूक होणाऱ्या चार बैलगाडीच्या चाकाच्या टायरमधील हवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोडली. खानापूर तालुक्यातील उदगिरी साखर कारखान्याकडे ट्रॅक्टरमधून होणारी ऊस वाहतूक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखली.

संघटनेने कुंडल येथील क्रांती साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर उसाने भरलेल्या गाड्या अडवून कारखान्याचे प्रवेशद्वार बंद केले. दरम्यान, शुक्रवारी (ता. १८) साखर कारखान्यांनी ऊस तोड थांबवली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवणार असल्याचा इशारा दिला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com