Crop Insurance : पीकविमा मिळण्यासाठी ‘स्वाभिमानी’ची बोंबा-बोंब

शेतकऱ्यांचे केज तहसिलसमोर आंदोलन
'Swabhimani' Strike to get crop insurance
'Swabhimani' Strike to get crop insuranceAgrowon

केज, जि. बीड : सरसकट पीकविमा (crop insurance), अनुदान मंजूर करावे, या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.१२) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे (Kuldip Karpe) यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर बोंबा-बोंब आंदोलन केले.

पंतप्रधान पीकविमा योजना हंगाम-२०२२ मध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीच्या जोखमीअंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी ९ सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत तालुक्यातील केवळ हनुमंतपिंपरी महसूल मंडल सोयाबीन पीकविमा नुकसान भरपाईसाठी निश्चित केले. मात्र तालुक्यातील केज, बनसारोळा, होळ, युसूफवडगाव, चिंचोलीमाळी, आडस, विडा, नांदूरघाट व मस्साजोग या महसूल मंडलांतील सोयाबीन, उडीद व मूग उत्पादक शेतकरी या पीकविमा नुकसान भरपाईपासून वंचित राहतील.

'Swabhimani' Strike to get crop insurance
`पपईचा पिकविमा योजनेत समावेश करा`

मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्केपेक्षा जास्त घट असणाऱ्या महसूल मंडलांत २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढली आहे. यामध्ये जिल्ह्यात एकूण ६२ पैकी केवळ १६ महसूल मंडलांतच सरासरी उत्पादनात ५० टक्केपेक्षा जास्त घट दाखवण्यात आली आहे. परंतु वस्तुस्थिती पाहता जिल्ह्यातील इतर सर्वच महसूल मंडलांत पावसाने मारलेल्या दडीमुळे फूलगळ व शेंगगळ होऊन सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पीकविमा कंपनीचे अधिकारी व जिल्हा प्रशासनातील महसूल अधिकाऱ्यांनी संगनमत करून शेतकऱ्यांचे नुकसान दाखवले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

वंचित मंडलांतील सोयाबीन, मूग व उडीद उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा सरसकट देण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार दुल्हाजी मेंडके यांना देण्यात आले. या आंदोलनात ‘स्वाभिमानी’चे तालुकाध्यक्ष अमोल थोरात, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अतुल गवळी, शहराध्यक्ष फिरोज पठाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पांचाळ, सुग्रीव करपे, धीरज सूर्यवंशी, किरण चाळक, गणेश देशमुख, अजय वाघमारे, रवी बचुटे, पिनू गोरे व शरद इंगळे सहभागी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com