स्वतंत्र भारत पक्ष निवडणुका स्वबळावर लढवणार ः घनवट

राजकारणातील समाजवादी व्यवस्थेमुळे भांडवलशाही आणि भ्रष्टाचार वाढला आहे. भ्रष्टाचारातून पैसा, पैशांतून गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीतून सत्ताकारण हे चक्र सुरू आहे.
Anil Ghanwat
Anil GhanwatAgrowon

पुणे ः ‘‘राजकारणातील समाजवादी व्यवस्थेमुळे भांडवलशाही आणि भ्रष्टाचार (Corruption) वाढला आहे. भ्रष्टाचारातून पैसा, पैशांतून गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीतून सत्ताकारण हे चक्र सुरू आहे. यामध्ये शेतकरी पिचला आहे. शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) दिवसेंदिवस वाढत आहे. हे सर्व बदलण्यासाठी देशातील परवानाराज संपुष्टात आणत मुक्त अर्थव्यवस्था (Open Economy) आणणे गरजेचे आहे. यासाठी स्वतंत्र भारत पक्ष देशातील सर्व निवडणुका स्वबळावर लढेल,’’ अशी घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanwat) यांनी गुरुवारी (ता. १५) केली.

Anil Ghanwat
Ethanol Production: इथेनॉलकडे साखर वळवण्याचे प्रमाण चार वर्षांत अकरापट

स्वतंत्र भारत पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत घनवट बोलत होते. या वेळी पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षा सीमा नरोडे, पुणे शहराध्यक्ष अ‍ॅड. महेश गजेंद्रगडकर, अर्थशास्त्राचे अभ्यासक अमित सिंग उपस्थित होते.

Anil Ghanwat
Sugar : कारखान्यांच्या गोदामांवर छापे टाका, बेहिशोबी साखर कळेल

घनवट म्हणाले,‘‘स्वतंत्र भारत पक्ष ही स्वतंत्रतावादी विचारांचा पुरस्कार करते व देशात किमान सरकार असावे व सरकारने संरक्षण, कायदा व सुव्यवस्था राखण्यापलीकडे इतर उद्योग, व्यापारात हस्तक्षेप करू नये, असे या पक्षाचे धोरण असेल. आमच्या पक्षाला चक्रवर्ती राजगोपालाचारी (राजाजी) यांच्या स्वतंत्र पक्षाचा व शरद जोशी यांच्या स्वतंत्र भारत पक्षाचा राजकीय वारसा लाभला आहे. यामुळे यांच्या विचारावर पक्षाचे काम करणार आहे. पक्षाच्या जाहिरनाम्यामध्ये खुल्या आर्थिक धोरणाचा पुरस्कार केला आहे. देशातील बेकारी, गरिबी, भ्रष्टाचार, राजकारणातील गुन्हेगारी व देशाच्या कर्जबाजारीपणावरील खुले आर्थिक धोरण हाच उपाय आहे.’’

भांडवलशाहीने शेती शेतकरी आणि ग्राहकांची लूट सुरू आहे. यामुळे शेती किफायतशीर राहिलेली नाही. ग्राहकांना देखील रास्त दरात शेतीमाल मिळत नाही. यातून प्रचंड लुट सुरू आहे. यातूनच गुन्हेगारी आणि राजकारण सुरू आहे.

- अनिल घनवट,

राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com