Agriculture : कृषी विस्तारासाठी प्रथमच हलली यंत्रणा

शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी सल्ला व तंत्रज्ञान पोचविणे हेच कृषी विभागाचे मुख्य उद्दिष्ट होते व दुसरे उद्दिष्ट केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे हे होते.
Agriculture Expantion
Agriculture ExpantionAgrowon

पुणे : सतत घोटाळे, गलथान कारभार आणि कागदपत्रांमध्ये गुंतलेली यंत्रणा अशी तयार झालेली प्रतिमा बदलविणारे अनेक उपक्रम सध्या कृषी विभागात (Department Of Agriculture) सुरू असल्याचे दिसून येते आहे. विशेष म्हणजे विस्ताराची यंत्रणा गावपातळीपर्यंत प्रथमच मोठ्या प्रमाणात पोहचत असून त्यात समूह माध्यमांचा वाटा लक्षणीय आहे.

Agriculture Expantion
'मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन' योजनेचा विस्तार

“शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी सल्ला व तंत्रज्ञान पोचविणे हेच कृषी विभागाचे मुख्य उद्दिष्ट होते व दुसरे उद्दिष्ट केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे हे होते. मात्र, कृषी विभागाची यंत्रणा दुर्दैवाने अनावश्यकपणे कागदी तक्ते भरण्यात जुंपवण्यात आली. त्यातून विस्तार केंद्रित अंगाने शेतकरी व कृषी विभागाचा संपर्क कमी झाला होता. यंदा महाडीबीटीवर सर्व योजना आणल्या गेल्यामुळे कृषी कर्मचाऱ्यांना कागदी कामकाजातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना विस्तार उपक्रमांकडे वळविण्यात आले. शेतकऱ्यांपर्यंत व गावपातळीवर जाण्यासाठी उपक्रम व त्याची उद्दिष्टे देण्यात आली. त्याचा आढावा रोज घेतला जात आहे. त्यामुळेच विस्तारासाठी यंदा राज्यात प्रथमच यंत्रणा एकवटली आहे,” अशी माहिती कृषी विभागाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

Agriculture Expantion
जीवनसत्त्व ‘क’चे आहारातील महत्त्व

विस्तार यंत्रणेत सध्या दिसत असलेली सुधारणा कायमस्वरुपी नाही, दावा केला जात आहे. प्रशासनातील काही अनुभवी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विस्तार यंत्रणा कायमची बळकट करायची असल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘विषय विशेषज्ञ’ (सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट) बनवावे लागेल. आयुक्तांकडून दर आठवड्याला घेतली जाणारी बैठक व त्यात होणारी झाडाझडती यामुळे विस्तार यंत्रणा हलते आहे. विस्तार कार्यक्रमासाठी प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार व विस्तार संचालक विकास पाटील हे तीन अधिकारी व्यक्तिशः लक्ष घालत आहेत. यापैकी कोणत्याही अधिकाऱ्याची बदली झाल्यास पुन्हा विस्तार उपक्रम ढेपाळेल.”

विस्तार कार्यक्रम यंदा कशामुळे दिसतो आहे?

- गावनिहाय कृषी विस्तार आराखडे प्रथमच तयार केले जात आहेत

- गावागावात बैठका घेऊ कृषी योजनांची माहिती दिली जातेय

- कृषी विस्तार उपक्रम व मोहिमांसाठी कालबद्ध कार्यक्रम दिले गेले

- राज्य शासन व कृषी आयुक्तालयाकडून सूचना व धोरणात्मक निर्णय वेळेत जारी

- घरचे बियाणे वापर, उगवणक्षमता चाचण्या व बीजप्रक्रिया या मुद्द्यांवर प्रभावी मोहीम

- खते, बियाणे, अवजारे संबंधी पुरवठा व योजना अंमलबजावणीसाठी बैठका

- कृषी संजीवनी मोहिमेतून सलग आठवडाभर जागृती

- कृषी विस्तारासाठी व्हॉट्सअॅप, यूट्युब, वेबिनारचा प्रभावी वापर

कृषी विस्तार उपक्रमांसाठी किती जणांचा सहभाग

- विस्तार उपक्रमांची माहिती दिलेली गावे ः ३६,३३८

- घेतलेले कार्यक्रम ः ४०,०००

- तंत्रज्ञान व सल्ला देण्यासाठी केव्हीके व कृषी विद्यापीठांचे सहभागी शास्त्रज्ञ ः १५,०२०

- राज्यभर विस्तार उपक्रमांत सहभागी शेतकरी ः १०,९१,०००

- विस्तारासाठी उपयोगात आणलेले कृषी अधिकारी व कर्मचारी ः १७०००

- विस्तार उपक्रमाची माहिती दिलेले लोकप्रतिनिधी ः ४४,६१५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com