Food Processing : अन्नप्रक्रिया योजनेचा लाभ घ्या ः रूपनवर

अन्नप्रक्रिया उद्योग स्थापना करणे व अस्तित्वातील उद्योगांचे विस्तारीकरण करण्यासाठी इच्छुकांनी पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर यांनी केले आहे.
Food Processing : अन्नप्रक्रिया योजनेचा लाभ घ्या ः रूपनवर

इंदापूर : अन्नप्रक्रिया (Food Processing) उद्योग स्थापना करणे व अस्तित्वातील उद्योगांचे विस्तारीकरण करण्यासाठी इच्छुकांनी पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर यांनी केले आहे.

रूपनवर म्हणाले, की शासनाकडून उद्योग उभारणीकरिता प्रोत्साहन दिले जात आहे. पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेतून विविध नवीन अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीसाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे. याचा लाभ बेरोजगार युवक व उद्योग उभारू इच्छिणाऱ्यांनी घ्यावा. या योजनेद्वारे एकूण प्रकल्पाच्या ३५ टक्के व जास्तीत जास्त दहा लाख रुपयांपर्यंत अनुदान आहे. योजनेच्या लाभासाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com