Nagpur - Goa Expressway : नागपूर - गोवा द्रुतगती महामार्गावर सर्व तीर्थक्षेत्रे घ्या

आमदार मोहिते-पाटील यांची मागणी
Nagpur - Goa Expressway
Nagpur - Goa ExpresswayAgrowon

अकलूज : प्रस्तावित नागपूर ते गोवा द्रुतगती महामार्ग (Nagpur - Goa Expressway) नागपूरहुन अधिकाधिक अविकसित भागातून व तिर्थक्षेत्रांच्या मार्गे  गोव्यापर्यंत करावा अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील (Ranjeetsingh Mohitepatil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे केली आहे. दरम्यान या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.

Nagpur - Goa Expressway
Cotton Rate : कापसाचे दर दबावात

महाराष्ट्रातील अविकसित भागाचा व तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणांच्या विकासासाठी ही तीर्थक्षेत्रे महामार्गाच्या प्रवासात समाविष्ट करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांना लेखी निवेदन दिले असून या निवेदनात मोहिते-पाटील यांनी सध्याचा नागपूर ते गोवा हा मार्ग वर्धा - यवतमाळ - नांदेड - लातूर - सोलापूर - मिरज - कोल्हापूर-पणजी असा असून हा ९९० किलोमीटर लांबीचा पल्ला आहे‌.   या महामार्गात सर्व तिर्थक्षेत्रे समाविष्ट करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

Nagpur - Goa Expressway
Soybean Rate : सोयाबीन दराची स्थिती काय?

प्रवासाचा पल्ला होऊ शकतो कमी
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी तीर्थक्षेत्र माहूर (रेणुकामाता देवी), तीर्थक्षेत्र अंबाजोगाई (योगेश्वरी देवी), परळी (वैजनाथ मंदिर)आदीचा समावेश व्हावा यासाठी नागपूर - गोवा द्रृतगती महामार्ग हा नागपूर पासून बुटीबोरी - वर्धा - महागाव - अर्धापूर अंबाजोगाई - परळी - कुर्डूवाडी - अकलूज - म्हसवड - विटा कोल्हापूर ते पणजी याप्रमाणे केल्यास महामार्गाची लांबी कमी होऊन प्रवासाचा वेळही कमी होणर असल्याचे सांगितले.

...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com