APMC News : बाजार समितीचे माजी प्रशासक, अधिकाऱ्यांवरील गुन्हा मागे घ्या

सुमारे सहा महिन्यांपूर्वी बाजार आवारातील बेकायदा लिंबू विक्री करणाऱ्यांवर बाजार समिती प्रशासनाने अतिक्रमण कारवाई केली होती.
Pune APMC
Pune APMC Agrowon

Pune APMC : पुणे बाजार समितीचे माजी प्रशासक मधुकांत गरड, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह काही आडत्यांवर ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा तातडीने मागे घ्यावा, अन्यथा सोमवार (ता. १७) पासून बाजार समितीमधील व्यवहार बेमुदत बंद ठेवण्यात येतील, असा इशारा बाजार समितीमधील आडते संघटनेसह विविध कामगार संघटनांनी दिला आहे.

याबाबतचे सामूहिक निवेदन आडते असोसिएशनसह विविध संघटनांनी मुख्यमंत्री तथा पणनमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे पोलिस आयुक्तांना दिले आहे.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी बाजार आवारातील बेकायदा लिंबू विक्री करणाऱ्यांवर बाजार समिती प्रशासनाने अतिक्रमण कारवाई केली होती. ही कारवाई पोलिस प्रशासनाला सोबत घेऊन केल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यावेळी कोणतीही तक्रार आणि गुन्हे दाखल न करता सहा महिन्यांनी गुन्हे का दाखल करण्यात आले असा सवाल संघटनांनी उपस्थित केला आहे.

Pune APMC
Pune APMC News : बाजार समित्यांमधील गाळे, भूखंडवाटपास बसणार चाप

दरम्यान बाजार आवारात लिंबू विक्री करणाऱ्या महिलेस जातिवाचक शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निलंबित प्रशासकासह २० ते २५ जणांवर मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात विनयभंग व ॲट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलंबित प्रशासक मधुकांत गरड, दत्तात्रय कळमकर, संभाजी काजळे यांच्यासह २० ते २५ जण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या बाबत एका ४५ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान हा प्रकार घडला. फिर्यादी या भाजी मार्केट येथे लिंबू विक्रीचा व्यवसाय करतात.

गरड यांनी फिर्यादीस मारहाण करून त्यांच्याशी अश्लील वर्तणूक केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. घटनेनंतर काही वेळात बाजार समितीच्या लोकांनी लिंबूच्या पाट्या व पिशव्या फेकून देऊन विनयभंग केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. सहायक आयुक्त पौर्णिमा तावरे तपास करीत आहेत.

Pune APMC
APMC News : बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेचा प्रश्‍न ऐरणीवर

संघटनांची निषेध बैठक

खोटे गुन्हे दाखल झाल्याच्या निषेधार्थ बाजार आवारातील विविध संघटनांनी एकत्र येऊन बैठक घेतली. यावेळी बोलताना ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ म्हणाले, ‘‘कोणताही परवाना न घेता बेकायदेशीर लिंबू विक्री करणाऱ्यांवर बाजार समिती प्रशासनाने कारवाई केली आहे. ही कारवाई पोलिस प्रशासनाला सोबत घेऊन केली आहे.

बाजार आवारातील अतिक्रमण निर्मूलनाची कारवाईसाठी आम्ही विविध संघटना आग्रही होतो. मात्र कारवाई करताना खोटे गुन्हे दाखल करणे हे प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची करण होणारे आहे. त्यामुळे तातडीने गुन्हे मागे न घेतल्यास सोमवार (ता. १७) पासून बाजार बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहे.

यावेळी आडते असोसिएनशनचे अध्यक्ष बापू भोसले, सचिव करण जाधव, कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष नांगरे, शशिकांत नांगरे, ज्येष्ठ आडते गणेश घुले, आप्पा कोरपे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com