Maharashtra Crisis: एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणे अयोग्य: शरद पवार

भाजपच्या (BJP President) अध्यक्षांनी असे वक्तव्य केले की प्रादेशिक पक्षांना (Regional Forces) भवितव्य नाही, ते शिल्लक राहणार नाहीत. आणि आमचा एकच भाजप हा पक्ष देशामध्ये शिल्लक राहील.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

पुणेः ज्या वेळेस मी काॅंग्रेस पक्षातून बाहेर पडलो त्यानंतर मी पक्षाच्या चिन्हावर हक्क दाखविला नाही अथवा त्यांचे चिन्ह घेतले नाही. वेगळा पक्ष काढला आणि वेगळ चिन्ह घेतलं. त्यामुळं धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणं योग्य नाही, अशी टिप्पणी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर केली.

दरम्यान, राज्यात झालेल्या नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर पवार यांनी मी त्यावर बाेलणार नाही, राज्यातील नेते बाेलतील असेही स्पष्ट केले. ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, की एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते वेगळा पक्ष काढू शकतात.

धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणे योग्य नाही. जेव्हा मी काँग्रेसमधून बाहेर पडलो तेव्हा वेगळा पक्ष काढला वेगळे चिन्ह घेतले. त्यांचे चिन्ह आम्ही मागितले नाही. त्याच्यातून वादविवाद वाढवणे योग्य नाही, असेही पवार यांनी नमूद केले.

आपण सावध राहण्याची गरज

दरम्यान महागाईबाबत पवार म्हणाले, की श्रीलंकेत एकाच कुटुंबाची सत्ता होती. राष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री हे एकाच कुटुंबातील होते. श्रीलंकेत सत्तेचे केंद्रीकरण झाले. त्यामुळे असंतोष वाढायला लागला होता. त्यामुळे जनतेचा उद्रेक झाला. श्रीलंकेची जी परिस्थिती आहे ती एका दिवसातली किंवा काही महिन्यातली नाही. काही वर्षांतली आहे.

बांगलादेशमध्ये जी परिस्थिती उद्‍भवली आहे ती पाकिस्तानमध्ये देखील उद्‍भवू शकते. आपल्या आजूबाजूला हे वातावरण आहे याची नोंद आमच्या देशाच्या राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे, असेही पवार यांनी नमूद केले.

विशेषतः मोदींनी (Narendra Modi) आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने याची नोंद घेण्याची गरज आहे. सत्ता केंद्रित जिथे झाली तिथे हे प्रश्‍न निर्माण झाले. भारतात राष्ट्रीय पातळीवर सत्ता केंद्रित होते की काय, याची शंका लोकांमध्ये निर्माण होते आहे. सध्या आपल्याकडे उद्रेक होण्याची परिस्थिती दिसत नाही, पण आपण सावध राहण्याची शक्यता आहे, असेही पवार यांनी नमूद केले.

नितीशकुमार वेळीच सावध झाले

पवार यांनी बिहारच्या परिस्थितीवर तसेच भाजपचे नेते सुशील माेदी (Sushil Modi) यांच्या वक्तव्यावर भाष्य केले. ते म्हणाले, की भाजपच्या अध्यक्षांनी असे वक्तव्य केले की प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही, ते शिल्लक राहणार नाहीत. आणि आमचा एकच भाजप हा पक्ष देशामध्ये शिल्लक राहील. नितीशकुमारांची तक्रार आहे तीच तक्रार ही अकाली दलाची आणि इतर मित्र पक्षांची आहे. भाजप त्यांच्या सोबत असलेल्या मित्र पक्षाला हळूहळू संपवतात.

मित्र पक्षाकडून सेनेचा घात

सेना भाजप (Shivsena-BJP) एकत्र होते. सेनेत दुही कशी करता येईल अशी परिस्थिती निर्माण केली. सेनेच्या मित्र पक्षाने सेनेवर आघात केला. नितीशकुमार (Nitish Kumar) हे लोकांच्यात मान्यता असलेला नेता आहे. निवडणुकीत भाजप एकत्र येतात आणि मित्र पक्षातील लोकांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी घेतात. नितीशकुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आज भाजपचे नेते त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात. परंतु नितीशकुमारांनी टाकलेल पाऊल शहाणपणाचे आहे, असे पवार यांनी नमूद केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com