Folk Art Maharashtra : तमाशा फडमालक कर्जाच्या चक्रव्यूहात

महाराष्ट्राची लोककला आपल्या परीने जिवंत राहण्यासाठी प्रसंगी कर्ज काढून धडपडणाऱ्या तमाशा फड मालकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
Tamasha
Tamasha Agrowon

Folk Art Maharashtra कऱ्हाड, जि. सातारा ः महाराष्ट्राची लोककला आपल्या परीने जिवंत राहण्यासाठी प्रसंगी कर्ज (Laon) काढून धडपडणाऱ्या तमाशा फड मालकांवर (Tamasha Owner) कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

नियमित अनुदान आणि करोना काळातील कोरोना पॅकेजमध्ये जाहीर केलेली एक ते दोन लाखांची मदत तीन वर्षे होत आली तरीही फडमालकांना मिळालेली नाही. ज्येष्ठ कलाकारांना दरमहा मिळणारे मानधनही थकीत असल्याने कलाकारांची आर्थिक कोंडी झाली आहे.

त्यामुळे बहुतांश तमाशा फड मालक कर्जाच्या विळख्यात अडकले असून सरकारच्या मदतीच्या प्रतीक्षेत असलेले राज्यातील सुमारे १०५ तमाशा फड मोडकळीस आले आहेत.

ग्रामीण भागात लोककलेची नाळ तमाशाने घट्ट केली आहे. त्यातून मनोरंजनाबरोबर समाजप्रबोधनाचे काम तमाशा फड मालकांनी केले आहे.

दरवर्षी यात्रा-जत्रेत तमाशाचे फड लावले जातात. त्यासाठी फडमालकांकडे तारण ठेवण्यासाठी काहीच नसल्याने बॅंका, पतसंस्था त्यांना कर्जासाठी उभ्या करत नाहीत. त्यामुळे त्यांना होणाऱ्या कमाईच्या पार्श्वभूमीवर उसने पैसे घेऊन, खासगी सावकारांचे कर्ज घ्यावे लागते.

त्यासाठी कलाकारांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे २५ हजारांपासून तब्बल एक लाखापर्यंत आगाऊ रक्कमही द्यावी लागते. त्यानंतर लाइट, पाणी, जेवण आदींची तयारी केल्यानंतर तमाशाचा फड उभा राहतो.

मात्र एवढी सर्व उचापत करूनही मागील दोन वर्षे कोरोना महामारीचे संकट आले. त्यामुळे यात्रा-जत्रा, उरुसाला परवानगी नसल्याने तमाशा फडाचे नुकसान झाले. दसरा ते अक्षय तृतीया असे सात महिने फिरतीवर राहणाऱ्या तमाशा फडाला आर्थिक झळ बसली.

मागील तीन वर्षांपासून हा व्यवसाय पूर्णत: तोट्यात आहे. करोना संकटामुळे यात्रा रद्द होऊन तमाशा व्यवसायाला आर्थिक फटका बसला आहे. तमाशा फड मालकांनी अंगावर घेतले कर्ज अजूनही तसेच आहे. त्याचे व्याजही मोठे झाले आहे.

Tamasha
Agriculture Department : गणेश पाटील यांना ‘कृषिउद्योग’मधून हटविले

त्यादरम्यान या तमाशा कलावंतांना मदत करण्यासाठी तत्कालीन सरकारने राज्यातील तमाशा फडांना त्यांच्या वर्गवारीनुसार एक ते दोन लाखांपर्यंतची मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र त्याला तीन वर्षांचा कालावधी उलटला तरीही तमाशा फडमालकांना सरकारची मदत मिळालेली नाही. अनेकदा तमाशा फडमालक संघटनेकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला.

त्यावेळी फेब्रुवारी अखेरपर्यंत पैसे अकाउंटला जमा होतील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र तरीही कार्यवाही झालेली नाही. सरकारकडून केवळ आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नसल्याचे कलावंत सांगत आहेत.

Tamasha
Agriculture : रानातील धुक्यात न्हाली पहाट ओली

ज्येष्ठ कलाकार औषधालाही महाग

केंद्र शासन व राज्य शासनाकडून कीर्तनकार, गोंधळी, तमाशा, साहित्यिक, गायक, वादक, कवी, नाट्य, चित्रपट, वादक, लेखक आदींसाठी वृद्धापकाळात त्यांची फरपट होऊ नये यासाठी मानधन योजना सुरू केली आहे. केंद्राकडून चार हजार तर राज्य शासनाकडून श्रेणीनुसार तीन हजारपर्यंत मानधन मिळते.

अनेक ज्येष्ठ कलाकार दर महिन्याला या मानधनाची चातकाप्रमाणे वाट पाहतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांना मानधनच मिळालेले नाही. त्यामुळे या वयोवृद्ध कलाकारांवर औषधालाही महाग होण्याची वेळ आली आहे.

शासनाकडून चित्रपट, नाटकांसाठी अनुदान दिले जाते. मात्र मनोरंजन करून समाजप्रबोधन करण्याचे काम करणाऱ्या तमाशाला वेळेत अनुदान मिळत नाही. कोरोनात जाहीर केलेल्या मानधन अद्यापही मिळालेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस सरकारने त्याचा गांभीर्याने विचार करून कर्जात बुडालेल्या फडमालकांना मदतीचा हात दिला तरच महाराष्ट्राची लोककला जिवंत राहील.

- संभाजीराजे जाधव, अध्यक्ष अखिल भारतीय लोक कलावंत मराठी तमाशा परिषद

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com