ऐन पावसाळ्यात टॅंकरने पाणी पुरवठा सुरूच

चिखलदरा तालुक्यातील गावांमध्ये एका विहिरीवरून शेकडो लोकं पाणी भरत आहेत, अशी परिस्थिती आहे. आणखी काही दिवसांपर्यंत टंचाईची परिस्थिती कायम राहू शकते तसेच टँकर व विहिरी अधिग्रहणाची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
ऐन पावसाळ्यात टॅंकरने पाणी पुरवठा सुरूच
Water TankerAgrowon

अमरावती : जूनच्या मध्यंतरातसुद्धा पावसाने दडी मारल्याने एकीकडे बळीराजा चिंतेत बुडाला असून दुसरीकडे पाणीटंचाई कमी होण्याचे नाव घेत नाही. जूनच्या मध्यंतरी आणखी चार टँकर (Water Tanker) वाढविण्यात आल्याने पावसाळ्यातसुद्धा टंचाईचे ढग अद्याप दूर झालेले नाही.

खडीमल आणि रायपूर या चिखलदरा तालुक्यातील दोन गावांना पूर्वीपासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. आता त्यामध्ये प्रत्येकी दोन टँकरची वाढ झाली आहे. शिवाय १०३ गावांत खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मार्चपासूनच पाणीटंचाई सुरू झाली आहे. ती आजही कायम आहे. यावेळी जूनमध्ये सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, मात्र मॉन्सूनची वाटचाल संथगतीने होत असल्याने जूनच्या मध्यांतरातसुद्धा टंचाई कायम आहे.

चिखलदरा तालुक्यातील गावांमध्ये एका विहिरीवरून शेकडो लोकं पाणी भरत आहेत, अशी परिस्थिती आहे. आणखी काही दिवसांपर्यंत टंचाईची परिस्थिती कायम राहू शकते तसेच टँकर व विहिरी अधिग्रहणाची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ही आहेत टँकरची गावे

सावंगी मग्रापूर (चांदूररेल्वे), एकझीरा, मोथा, आकी, बकदरी, तारुबांधा, बहादरपूर, धरमडोह, लवादा, आलाडोह, रायपूर, गौलखेडा बाजार, सोमवारखेडा, नागापूर, खंडूखेडा, आवागड, खोंगडा, खडीमल, तोरणवाडी.

तालुकानिहाय विहीर अधिग्रहणाची संख्या

अमरावती ४, नांदगाव खंडेश्वर ४, भातकुली १, तिवसा ३, मोर्शी १२, वरुड ४, चांदूररेल्वे ११, अचलपूर ५, चिखलदरा २७, धारणी ४, धामणगावरेल्वे २.

अमरावतीकरांनीही अनुभवली टंचाई

दरवर्षी उन्हाळ्याच्या उकाड्यात ग्रामीण भागातील नागरिकांनाच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शहरी भागात अपवादात्मक परिस्थितीत पाण्याची अनुपलब्धता होते असते, मात्र यंदा याच महिन्यात दोन वेळा मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे सलग सात ते आठ दिवसांपर्यंत पाणीपुरवठा बंद राहिल्याने अमरावतीकरांनीसुद्धा पाणीटंचाईचा अनुभव घेतला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com