FM Disease : दशकाच्या शेवटपर्यंत लाळ्या खुरकुत निर्मूलनाचे लक्ष्य ः पंतप्रधान मोदी

अलिकडच्या काळात भारतातील अनेक राज्यांमध्ये लम्पी त्वचा आजारामुळे पशुधनाचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकार, विविध राज्यांसह सरकार, त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
Animal care
Animal care Agrowon

ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश (वृत्तसंस्था) : भारतात या दशकाच्या शेवटपर्यंत प्राण्यांमधील लाळ्या खुरकुत या आजाराच्या (Foot Mouth Disease) निर्मूलनाचे लक्ष्य ठेवले असून २०२५ पर्यंत १०० टक्के लसीकरण (Animal Vaccination) केले जाईल, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी (ता. १२) दिले. लम्पी त्वचा आजारामुळे (Lumpy Skin Disease) पशुधनाच्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त करताना ते म्हणाले, की आमच्या शास्त्रज्ञांनी लम्पी स्कीन आजारावर स्वदेशी लस बनविली आहे. या लसीच्या चाचण्या वाढवण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Animal care
Lumpy Skin : सरपंचाचे स्वखर्चातून ५०० जनावरांना लसीकरण

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्ट येथे आयोजित आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशन वर्ल्ड डेअरी समिट २०२२ च्या उद्‍घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. अलिकडच्या काळात भारतातील अनेक राज्यांमध्ये लम्पी त्वचा आजारामुळे पशुधनाचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकार, विविध राज्यांसह सरकार, त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. भारत प्राण्यांच्या सार्वत्रिक लसीकरणावर भर देत आहे. त्या अंतर्गत आमच्या शास्त्रज्ञांनी लम्पी स्कीन आजारावक स्वदेशी लसही तयार केली आहे. आम्ही त्याची चाचणीही वाढवत आहोत. आम्ही प्राण्यांच्या सार्वत्रिक लसीकरणावरही भर देत आहोत. आम्ही संकल्प केला आहे की २०२५ पर्यंत, आम्ही १०० टक्के प्राण्यांना लाळ्या खुरकुतविरुद्ध लसीकरण करू. या दशकाच्या शेवटपर्यंत आजारांपासून पूर्णपणे मुक्त होण्याचे आमचे ध्येय आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नुकतीच लम्पी-प्रोव्हॅक ही लस लाँच केली ज्यामुळे पशुधनांना लम्पी स्कीन आजारापासून संरक्षण मिळते. ही लस हिसार (हरियाना) येथील नॅशनल इक्वीन रिसर्च सेंटर यांनी भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, इज्जतनगर (बरेली) यांच्या सहकार्याने विकसित केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com