Tata Group : मिहानमध्ये गुंतवणुकीस टाटा समूह सकारात्मक

केंद्रीय मंत्री गडकरी यांना टाटा समूहाचे पत्र
Tata Group
Tata GroupAgrowon

नागपूर ः टाटा समूहाचा मिहानमध्ये प्रस्तावित एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे राज्यभर वादळ उठले आहे. त्यावर तोडगा काढत टाटा समूह मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास तयार असल्याचे पत्र टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रसेकरन (Natrajan Chandrsekaran) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पाठविले आहे.

Tata Group
Tata Airbus : ‘टाटा एअरबस’ गुजरातला गेल्याने आरोप प्रत्यारोप

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रसेकरन यांना पत्र पाठवून मिहानमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी असल्याकडे लक्ष वेधले होते. व्यवसायाच्या विस्तारासाठी आवश्यक पायाभूत सुविधा मिहानमध्ये उपलब्ध आहेत. महामार्ग, रेल्वे तसेच विमानसेवा उपलब्ध आहे. त्यामुळे टाटा समूहातर्फे टाटा स्टील, टाटा मोटर्स, टायटन इंडस्ट्री, व्होल्टास लि. असे विविध प्रकल्प येथे सहज उभारले जाऊ शकतात.

मिहानमध्ये उद्योग उभारणीच्या असलेल्या संधींबाबत विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलने (वेद) आराखडा तयार केला आहे. वेदच्या चमूला आपण भेटीची वेळ द्या. वेळ दिल्यास संबंधित आराखडा आपल्यासमोर सादर करतील, असेही गडकरी यांनी पत्रात नमूद केले होते.

गडकरींच्या या पत्राची टाटा समूहाने दखल घेतली असून, टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रसेकरन यांनी गडकरी यांच्या पत्राला सकारात्मक उत्तर देणारे पत्र पाठविले आहे. मिहानमध्ये सेझ व नॉनसेझ अंतर्गत जमीन उपलब्ध आहे.

तसेच रोड, रेल्वे व विमानसेवेशी हा परिसर जोडला गेला आहे, ही बाब आमच्यासाठी समाधानकारक आहे. लवकरच आमची टीम नागपुरात येऊन मिहानमधील एकूणच संधीची पाहणी करेल. तसेच विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (वेद) प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांनी सुचविलेल्या गुंतवणुकीच्या संधीवर विचार केला जाईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com