Tax Collection Day : परभणी जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर करवसुली दिन

चालू आर्थिक वर्षात (२०२२-२३) ग्रामपंचायतीमधील करवसुलीचे प्रमाण अत्यल्प आहे.
Gram Panchayat Tax
Gram Panchayat TaxAgrowon

Pabhani News चालू आर्थिक वर्षात (२०२२-२३) ग्रामपंचायतीमधील करवसुलीचे (Tax Collection) प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींनी १०० टक्के करवसुली करावी म्हणून परभणी जिल्ह्यात बुधवारी (ता.१५) आणि गुरुवारी (ता. १७), तसेच मंगळवारी (ता.२८) आणि बुधवारी (ता.२९) या चार दिवसांच्या कालावधीत करवसुली दिनाचे (Tax Collection Day) आयोजन करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी दिल्या.

ग्रामपंचायत स्तरावरील करवसुली होण्यासाठी अनेक प्रकरणे लोक अदालतींमध्ये निकाली काढण्यात आली आहेत. परंतु हे प्रमाण अत्यल्प असल्याने चारदिवसीय करवसुली दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Gram Panchayat Tax
Gram Panchayat Tax : शंभर टक्के कर भरणाऱ्या महिलांचा पैठणी देऊन गौरव

यामध्ये तालुकास्तरावर संबंधित तालुक्यांचे गट विकास अधिकारी सूक्ष्म नियोजन करतील. या मोहिमेमध्ये संबंधित ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामरोजगार सेवक यांचा देखील सक्रिय सहभाग राहील.

Gram Panchayat Tax
Co-operative sugar factories Income Tax : सहकारी साखर कारखान्यांचा अडकलेला प्राप्तिकर व्याजासह मिळणार

त्याचबरोबर पंचायत समिती स्तरावरील सर्व विभागांतील विस्तार अधिकारी, कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतींमध्ये जाऊन करवसुलीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सूचित केले आहे.

पथकाच्या घरोघरी भेटी

विशेष बाब म्हणून गावांतील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी करवसुली पथक सकाळी लवकर गावात जाऊन घरोघरी भेट देईल. या मोहिमेमध्ये त्या त्या दिवशी जमा झालेली करवसुली संबंधित ग्राम निधीमध्ये भरण्यात येईल, असेही खांडेकर यांनी कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com