डाळिंब केंद्र, जैन इरिगेशनमध्ये तंत्रज्ञानासंबंधी सामंजस्य करार

सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राकडून शिल बायोटेक लिमिटेड आणि जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड यांना रोगमुक्त उती संवर्धित डाळिंब रोपनिर्मितिसाठीचे बायोहार्डनिंग तंत्रज्ञान नुकतेच हस्तांतरित करण्यात आले.
Pomegranate
Pomegranate Agrowon

सोलापूर ः सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राकडून (National Pomegranate Research Center) शिल बायोटेक लिमिटेड (Sheel Biotech Ltd) आणि जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड (Jain Irrigation System Ltd) यांना रोगमुक्त उती संवर्धित डाळिंब रोपनिर्मितिसाठीचे (Pomegranate Seedling) बायोहार्डनिंग तंत्रज्ञान (Biohardning Technology) नुकतेच हस्तांतरित करण्यात आले.

याप्रसंगी जैन इरीगेशनकडून डॉ. के. बी. पाटील, डॉ. अनिल पाटील, शिल बायोटेककडून विजय पाटोळे यांनी तसेच आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कार्यक्रमास मुख्य पाहुण्या म्हणून सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्सना शर्मा, डॉ. निलेश गायकवाड, डॉ. आशिष मायेती आदी उपस्थित होते.

Pomegranate
Pomegranate : नुकसानग्रस्त डाळिंब उत्पादकांना मदत द्यावी

यावेळी डॉ. पाटील म्हणाले, तेलकट डागामुळे २००६ मधे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. रोगाचे कारण कोणाला सांगता येत नव्हते. २००८ मध्ये डाळिंब संशोधन केंद्राने हा रोग जीवाणूजन्य आहे आणि रोगग्रस्त रोपांमुळे मोठ्या प्रमाणात पसरतो, असे संशोधन केले. तेव्हा डाळिंबाचे क्षेत्र ८० हजार हेक्टर इतके होते, तर आज सुमारे तीन लाख दहा हजार हेक्टर इतके आहे.

Pomegranate
Pomegranate : डाळिंबाचे आरोग्यदायी महत्त्व

दरवर्षी लागवड वाढत आहे यात डाळिंब संशोधन केंद्राचा मोलाचा वाटा आहे. शिल बायोटेकचे विजय पाटोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. मराठे यांनी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे डाळिंब संशोधनामधील योगदान अधोरेखित केले. तसेच त्यांनी तंत्रज्ञान निर्मिती करणाऱ्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एन. व्ही. सिंह यांनी केले.

कृषी संशोधनातून कृषी विकास

प्रमुख पाहुण्या डॉ. फडणवीस यांनी डाळिंब संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, विद्यार्थी यांच्याशी यावेळी संवाद साधला. त्या म्हणाल्या, कृषी क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व मोठे आहे. पण अलीकडच्या काळात राष्ट्रीय उत्पादनामधील कृषी क्षेत्राचा वाटा कमी होतो आहे. त्यावर गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवताना, कृषी संशोधनातून कृषिविकास घडवून आणावा, असे मत त्यांनी केले. तसेच संशोधन केंद्राच्या तंत्रज्ञान निर्मिती व हस्तांतरण कार्याबद्दल त्यांनी केंद्राचे अभिनंदन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com