Weather Update : आज राज्यात हवामान कोरडे

दिवाळीनंतर तापमानात घट होत असल्याने थंडीची हुडहुडी वाढली आहे.
Winter
Winter Agrowon

पुणे : राज्यात गारठा (Clod Weather) वाढू लागला असल्याने थंडीची (Winter In Maharashtra) चाहूल लागली आहे. कमाल तापमानात चढ-उतार सुरूच असून, दुपारी उन्हाचा चटका टिकून आहे. सोमवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये निफाड येथील गहू संशोधन केंद्रात (Wheat Research Center) राज्यातील नीचांकी १२.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १) राज्यात हवामान कोरडे (Dry Weather) राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Winter
Cold Weather : दापोलीकरांना थंडीची चाहूल

नैॡत्य बंगालच्या उपसागरात उत्तर श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तर या प्रणालीपासून केरळ, तमिळनाडू ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण भारतातील राज्यात पावसाचा जोर वाढणार असला तरी महाराष्ट्रात मात्र निरभ्र आकाश आहे.

Winter
Weather Update : राज्यातील किमान तापमान घटलं

उत्तरेकडून येणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढू लागला आहे. रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात किमान तापमान २० अंशांच्या आसपास होते. तर उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १६ अंशांच्या खाली घसरले होते. तर कमाल तापमान २९ ते ३५ अंशांच्या दरम्यान आहे.

सोमवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.६ (१३.४), जळगाव ३४(१४.५), कोल्हापूर ३१.२ (१७.४), महाबळेश्वर २६.६(१३.४), नाशिक ३०.७ (१३.६), निफाड ३०.१ (१२), सांगली ३२.१(१५.८), सातारा ३०.४(१४.२), सोलापूर ३२.७ (१७), सांताक्रूझ ३५.४(२०.५), डहाणू ३४.३ (२०.५), रत्नागिरी ३५ (१९.४), औरंगाबाद ३०.६ (१३.३), नांदेड ३१.६ (१७), उस्मानाबाद - (१४), परभणी ३१.६ (१५.९), अकोला ३३.२ (१७.७), अमरावती ३२.० (१५.५), बुलडाणा ३०.६ (१६.४), ब्रह्मपुरी ३१.८ (१६.३), चंद्रपूर ३१.४ (१७.२), गडचिरोली ३१.४(१६), गोंदिया ३०(१५.६), नागपूर ३०.८ (१५.६), वर्धा ३१(१६.४), वाशीम - (१६.८), यवतमाळ ३२.५ (१४.५).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com