Weather Update : तापमानात चढ-उतार सुरूच

राज्यात थंडीचा हंगाम सुरू झाल्यानंतर कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत.
 Temperature continues to fluctuate
Temperature continues to fluctuateAgrowon


पुणे : राज्यात थंडीचा हंगाम सुरू झाल्यानंतर कमाल आणि किमान तापमानात (Temprature) चढ-उतार सुरूच आहेत. निफाड (Niphad) येथील गहू संशोधन केंद्रात गुरुवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नीचांकी १०.५ अंश सेल्सिअसवर तापमानाची नोंद झाली. आज (ता. ४) राज्यात निरभ्र आकाशासह कोरडे हवामान राहण्याचा अंदाज कायम आहे.

 Temperature continues to fluctuate
Cotton Production: देशातील कापूस उत्पादकता कमी का ? | ॲग्रोवन

दक्षिण तमिळनाडू आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. या प्रणालीपासून केरळ, लक्षद्वीपपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. नैॡत्य बंगालच्या उपसागरामध्ये समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात गारठा जाणवू लागला आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात सातत्याने चढ-उतार सुरूच आहेत. पहाटे गारठ्याबरोबरच काही प्रमाणात धुके आणि दव पडत असल्याचे चित्र आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

 Temperature continues to fluctuate
Soybean Rate : सोयाबीन दराची स्थिती काय?

गुरुवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.८ (१३.१), जळगाव ३३.३ (१३.७), धुळे ३२ (११.८), कोल्हापूर ३१.१ (२१), महाबळेश्‍वर २६.१(१४.१), नाशिक ३०.१ (१३.२), निफाड ३०.२ (१०.५), सांगली ३१.६ (२०.१), सातारा २९.७ (१७.६), सोलापूर ३३.५ (१८.१), सांताक्रूझ ३४.६ (२०.२), डहाणू ३४.८ (२०.२), रत्नागिरी ३५ (२२), औरंगाबाद ३०.६ (१४), नांदेड ३१ (१७.२), उस्मानाबाद ३०.७ (१६), परभणी ३१ (१५), अकोला ३३.१ (१६.९), अमरावती ३२.४ (१५.१), बुलडाणा २९.७ (१७), ब्रह्मपुरी ३३.२ (१७.४), चंद्रपूर - (१६.६), गडचिरोली ३१.८(१५.८), गोंदिया ३०.४ (१५.८), नागपूर ३१.२ (१६.३), वर्धा ३१(१६.६), वाशीम ३१.२ (-), यवतमाळ ३१.२ (१३.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com