Weather Update : उन्हाचा चटका अन् गारठाही

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत असल्याने पहाटे गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका अनुभवायला मिळत आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात (Temperature Fluctuating) चढ-उतार होत असल्याने पहाटे गारठा (Cold Weather) आणि दुपारी उन्हाचा चटका (Heat) अनुभवायला मिळत आहे. मंगळवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये निफाड येथील गहू संशोधन केंद्र (Wheat Research Center) येथे १२ अंश सेल्सिअस तापमानाची, तर रत्नागिरी येथे सर्वाधिक ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Weather Update
Weather Update : राज्यात पावसाची शक्यता नाही

नैॡत्य बंगालच्या उपसागर आणि लगतच्या विषुववृत्तीय समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारपर्यंत (ता. १०) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली शुक्रवारपर्यंत (ता. ११) तमिळनाडू, पद्दूचेरीकडे येण्याचे संकेत आहेत. या प्रणालीपासून आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Weather Update
Weather Station : वेध नव्या हवामान केंद्रांचा!

राज्यात थंडीची चाहूल लागली असली, तरी अद्याप कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. राज्यात पहाटे गारठा, धुके आणि दव पडत होते. तर अंशतः ढगाळ हवामान असले तरी दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यात किमान तापमान १२ ते २१ अंशांच्या दरम्यान, तर कमाल तापमान ३१ ते ३६ अंशांच्या आसपास होते. आज (ता. ९) राज्यात कोरड्या हवामानासह कमाल आणि किमान तापमानात वाढ-घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.१ (१३.६), नगर - (१५.५), जळगाव ३५.२ (१६), धुळे ३४ (१२.२), कोल्हापूर ३२.१ (१८.६), महाबळेश्‍वर २७.७ (१५.६), नाशिक ३२.२ (१३.२), निफाड ३१.८ (१२), सांगली ३३.२(१७.१), सातारा ३१.९(१५.०), सोलापूर ३४.४ (१९.५),

सांताक्रूझ ३४.८ (२१.४), डहाणू ३१.८ (१९.६), रत्नागिरी ३५.६ (२१), औरंगाबाद ३१.७ (१५), नांदेड ३१.८ (१७.६), उस्मानाबाद ३२ (१३.८), परभणी ३२.९ (१६.६), अकोला ३५.१ (१९.०), अमरावती ३४ (१५.७), बुलडाणा ३१.६ (१८.५), ब्रह्मपुरी ३३.६ (१७.३), चंद्रपूर ३२ (२०.२), गडचिरोली ३२.२ (१६.४), गोंदिया ३२.५(१५.२), नागपूर ३३ (१५.२), वर्धा ३२.६ (१६.४), वाशीम ३४.२ (१६.५), यवतमाळ ३४.५ (१४.५).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com