Crop Damage : होत्याचे नव्हते झाले’

परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दहा दिवस पावसाचा दणका
Crop Damage
Crop DamageAgrowon

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तब्बल दहा दिवसांपासून पाऊस (Heavy Rainfall) सुरु आहे. शुक्रवारी (ता.१४) या दोन जिल्ह्यांतील अनेक मंडलांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कपाशी, फळे, भाजीपाला पिके, बागायत पिकांचे अपरिमित नुकसान (Crop Damage) झाले. निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला.

Crop Damage
Kharif Crop: सोयाबीन, कापूस, तूर पिकाचे व्यवस्थापन कसे कराल?| Agrowon | ॲग्रोवन

होत्याचे नव्हते झाले. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत. विमा भरपाई मंजूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सोयाबीनची काढणी सुरु आहे. परंतु पाऊस उघडीप देत नसल्यामुळे शेतातील उभे, कापणी केलेले, गंजी लावलेल्या सोयाबीनचे भिजून नुकसान झाले आहे.

Crop Damage
Crop Damage : अतिवृष्टीनं शेतकऱ्यांची स्वप्नं मातीत काळवंडली

सततच्या पावसाने भिजल्यामुळे बुरशीची वाढ होऊन सोयाबीन काळवंडले आहे. ओढ्या-नाल्यांच्या पुरामुळे जमिनी खरडून गेल्या आहेत. पिके वाहून गेली आहेत. शेतातून पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे शेंगांना मोड फुटत आहेत. तर, कापसाची वेचणी ठप्प झाली आहे. भिजल्यामुळे बोंडातील कापसाच्या वाती झाल्या आहेत. सर्वच शेतकऱ्यांची सोयाबीनची काढणी सुरु आहे. त्यामुळे अनेक भागांत मजूर मिळत नाहीत. पाणी आणि चिखलामुळे हार्वेस्टर, मळणी यंत्र शेतामध्ये नेता येत नाही. पाऊस थांबत नसल्यामुळे नुकसानीची व्याप्ती वाढत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

तीन तास मुसळधार पाऊस झाला. ओढ्या काठच्या दहा एकरांवर सोयाबीन आहे. कापणी केलेल्या दोन एकरांवरील सोयाबीनच्या गंजी भिजल्याने नुकसान झाले.

- उमेश शिंदे, वांगी, ता. परभणी.

मुसळधार पावसामुळे ८ एकरांवरील कापणी केलेले सोयाबीन अनेक तास पाण्यात राहिले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. गावातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन वाहून गेले. जमिनी खरडून गेल्या आहेत. तत्काळ नुकसानीचे पंचनामे करावेत. विमा भरपाई द्यावी.

- शेख मोबीन, मांडाखळी, जि. परभणी.

१२ पैकी ३ एकर सोयाबीनची कापणी झाली. एक एकरवरील सोयाबीनची मळणी सुरु असताना अचानक जोरदार पाऊस आला. त्यामुळे शेतातील तसेच मळणी केलेले सोयाबीन भिजले. त्यामुळे नुकसान झाले. सरकारने मदत द्यावी.

- बालासाहेब हिंगे, मजलापूर, ता. पूर्णा, जि. परभणी.

यंदा पावसाने कहर केला आहे. सोयाबीन काढणीचा खोळंबा झाला आहे. आता सोयाबीन काढणी सुरु आहे. त्यामुळे मजुरांची समस्या आहे. चिखलामुळे शेतात हार्वेस्टर जात नाही. पाऊस सुरुच असल्यामुळे उभे तसेच कापणी केलेल्या सोयाबीनची नासाडी झाली.

- पंकज अडकिणे, डोंगरकडा, ता.कळमनुरी, जि. हिंगोली.

परभणी ः मुसळधार पावसामुळे मांडाखळी (ता.परभणी) येथील शेख मोबीन यांच्या कापणी केलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com