Sugarcane Acreage : उसाखालील क्षेत्र स्थिर

खानदेशात यंदा उसाखालील क्षेत्र स्थिरावले आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक १२ हजार हेक्टरवर उसाचे क्षेत्र आहे. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात सुमारे १५ हजार हेक्टरवर ऊस आहे.
Sugarcane
SugarcaneAgrowon

जळगाव : खानदेशात यंदा उसाखालील क्षेत्र (Area Under Sugarcane) स्थिरावले आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक १२ हजार हेक्टरवर उसाचे क्षेत्र (Sugarcane Acreage) आहे. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात सुमारे १५ हजार हेक्टरवर ऊस आहे.

धुळ्यातही सुमारे अडीच हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. शिरपूर तालुक्यात उसाची अधिक लागवड झाली आहे. उसाची तोडणी यंदा वेळेत झाली. पावसाने मध्यंतरी अडथळे आले, पण तोडणी पूर्ण झाली. उसाची लागवड खानदेशात गेले तीन वर्षे स्थिर आहे. कारण दरही बरे आहेत.

Sugarcane
Sugarcane Transport : ‘ऊस वाहतुकीच्या वाहनांना रिफ्लेक्टरची मोहीम राबवावी’

तसेच खासगी व काही सहकारी कारखानेदेखील गाळपात जोमाने काम करीत आहेत. केळी, कापूस, भाजीपाला पिकांमध्ये अधिकची जोखीम आहे. यामुळे तापी, सुसरी, अनेर नदीकाठचे अनेक शेतकरी ऊस पिकाकडे वळले आहेत.

Sugarcane
Sugarcane Harvester Subsidy : केंद्राकडून निधी मंजूर, राज्य शासनाकडून प्रतीक्षाच

नंदुरबार जिल्ह्यात शहादा, तळोदा तालुक्यांत अधिकची ऊस लागवड आहे. जिल्ह्यात यंदा चार कारखाने जोमात सुरू आहेत. त्यात पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथे सातपुडा सहकारी कारखाना, डोकारे (ता. नवापूर) येथे आदिवासी सहकारी कारखाना, तळोदा येथे श्रीकृष्ण हा खासगी कारखाना आणि समशेरपूर (ता. नंदुरबार) येथे आयान शुगर हा खासगी कारखाना सुरू आहे. ‘आयान’ने गाळप क्षमता वाढविली आहे. हा कारखाना सरत्या हंगामात उशिरा सुरू झाला तरी गाळपात या कारखान्याने वेगात काम केले.

जळगाव जिल्ह्यात तीन साखर कारखाने सुरू आहेत. मागील वर्षी दोनच कारखाने सुरू होते. खानदेशात सुमारे २६ लाख टन ऊसगाळप यंदा होऊ शकते. न्हावी (ता. यावल) येथील मधुकर सहकारी कारखाना बंद होता. पण या कारखान्याची विक्री झाल्याने तोदेखील सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

खानदेशबाहेरील कारखाने नाहीत सक्रिय

जळगाव जिल्ह्यात नगर, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यांतील कारखान्यांनी देखील उसाची तोडणी केली. चाळीसगाव तालुक्यात नगर, औरंगाबादमधील कारखान्यांनी ऊसतोडणी केली. पण यंदा या भागातील कारखानदार फारसे जळगावात ऊस खरेदीसाठी सक्रिय नसल्याचे चित्र आहे. कारण खानदेशातील कारखाने वेगात तोडणी करीत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com