Satara News: सातारा जिल्ह्यातील कृषिपंपाची थकबाकी हजार कोटींवर

वीज वितरण कंपनीच्या कृषिपंपाची थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. कृषिपंपासाठी विजेचा वापर पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात जास्त आहे.
 Agricultural Pump Satara News
Agricultural Pump Satara NewsAgrowon

Satara News : वीज वितरण कंपनीच्या कृषिपंपाची (Agriculture Pump) थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. कृषिपंपासाठी विजेचा (Agriculture Electricity) वापर पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात जास्त आहे.

येथीलच शेतकरी वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष करीत असून, सातारा मंडळात तब्बल एक लाख ८४ हजार शेतकऱ्यांनी वीजबिल भरलेले नाही. त्यांची थकबाकीची रक्कम एक हजार कोटींवर पोहोचली आहे.

जिल्ह्यात बागायती क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून त्यासाठी कृषिपंपाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. कृषीचे नवीन कनेक्शन मागण्याचे प्रमाण सातारा जिल्ह्यात मोठे आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत सातारा विजेच्या मागणीत पाचव्या क्रमांकावर आहे. कृषिपंपाच्या वीजबिलाची थकबाकी ही वीज वितरणची डोकेदुखी झाली आहे.

 Agricultural Pump Satara News
Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीजबिल थकबाकी वसुलीसाठी मोहीम

राज्याची थकबाकी १२ हजार ६१ कोटींवर आहे. कृषिपंपासाठी वीज वापरात पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा हे जिल्हे आघाडीवर आहेत. येथे उसाचे क्षेत्र मोठे असून सिंचनासाठी सर्वाधिक विजेचा वापर होत आहे. ऊस, फळबागा, भाजीपाला व फुलशेती यासाठी विजेचा वारेमाप उपयोग होत आहे.

मात्र, कृषिपंपाचे वीजबिल भरण्याकडे सधन जिल्ह्यातील शेतकरी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. सातारा मंडळाची थकबाकी एक हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामध्ये एक लाख ८४ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. मध्यंतरी वीज वितरण कंपनीने कनेक्शन तोडण्याची मोहीम राबवली.

 Agricultural Pump Satara News
Agriculture Electricity : साहेब... आमच्या पिकांसाठी वीज तरी द्या

पण, शासनाने महावितरणला सवलत योजना लागू करण्यास सांगितल्याने शेतकऱ्यांनी काही प्रमाणात शेतीपंपाचे वीजबिल भरले. पण, थकबाकीची रक्कम कमी होत नाही. आता पुन्हा एकदा ही रक्कम वाढली आहे.

याविरोधात कठोर पावले उचलल्यास बागायती शेतीचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे महावितरणकडून कडक पावले उचलली जात नाहीत. शेतकऱ्यांनी किमान हप्ते करून वीज बिले भरणे गरजेचे आहे.

मंडळनिहाय थकबाकी...

सोलापूर : ५३३८, सांगली : १५७६, बारामती : २३७९, सातारा : १०००, कोल्हापूर : १९६२, पुणे ग्रामीण : ११३८.

‘शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा’

वीज वितरण कंपनीने नवीन कृषिपंप धोरण २०२० तयार केले असून, ३१ मार्च २०२३ पर्यंत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना थकबाकीवर ३० टक्के सूट देण्यात येणार आहे.

तसेच विलंब आकार व व्याज पूर्णत: माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com