Soybean Arrival : धामणगावात सोयाबीनची आवक वाढली

आतापर्यंत २० हजार क्विंटलपर्यंत खरेदी-विक्रीचे व्यवहार
Soybean Arrival
Soybean ArrivalAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
धामणगाव रेल्वे, अमरावती : खरिपातील मुख्य पीक असलेले आणि शेतकऱ्यांसाठी पिवळे सोने म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन (Soybean) शेतकऱ्यांच्या घरात आले आहे. त्यामुळे दिवाळी सण होताच येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून सोयाबीन शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आतापर्यंत २० हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.

Soybean Arrival
Soybean Market: सोयाबीन विक्रीसाठी बाजारात रांगा

खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणजे सोयाबीन व कापूस यावर्षी अवेळी झालेल्या पावसामुळे खराब झाले होते. त्यामुळे या पिकांचे उत्पादनसुद्धा घटले आहे. उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना होणारा फायदा हा कमी झाला. यामुळे सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकरी भाव कधी वाढतील, याची वाट पाहत होते. कारण दिवाळीच्या तोंडावर दर किमान पातळीवर स्थिर होते. यामुळे आवकदेखील घटली होती. सोयाबीनचे दर चार हजार चारशे ते पाच हजार पन्नास एवढे आहेत. तथापि, दररोज जवळपास दोन ते अडीच हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना परस्पर आपला शेतमाल बाहेर विक्री न करता बाजार समितीमध्येच जाहीर लिलावात विक्रीकरिता आणावा, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक भालचंद्र पारिसे व सचिव दिनेश गोमासे यांनी केले आहे.

शेतीमाल कृषी तारण कर्ज योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना बाजार समितीच्या गोदामात तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्के एवढी रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जाते. ही कर्जाची रक्कम एकूण सहा महिन्यांसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध होते. या कर्जाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी बांधवांच्या शेतमालाला गोदाम भाडे, विमा, देखरेख खर्च इत्यादी बसत नसतो. हा सर्व खर्च बाजार समिती उचलत असते. तरी शेतकऱ्यांनी शेतमाल कृषी तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा.
-दिनेश गोमासे, सचिव कृउबास.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com