Nashik DCC Bank : बँकेला वसुलीशिवाय पर्याय नाही

थकबाकीदाराकडे अडकलेला पैसा जिल्हा बँकेतील ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींचा आहे. त्यामुळे थकबाकीदारांकडून वसूल करून ठेवीदारांच्या ठेवी देण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेच्या कायद्यानुसार बँकेची आहे.
Nashik DCC Bank
Nashik DCC BankAgrowon

Nashik News थकबाकीदाराकडे अडकलेला पैसा जिल्हा बँकेतील (Nashik DCC Bank) ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींचा आहे. त्यामुळे थकबाकीदारांकडून वसूल करून ठेवीदारांच्या ठेवी देण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेच्या (RBI) कायद्यानुसार बँकेची आहे.

बॅंकेतील ठेवीदारांच्या सर्व ठेवी सुरक्षित आहे. त्यांचा विमा काढण्यात आलेला आहे. मात्र थकबाकी मोठी असल्याने वसुलीशिवाय पर्याय नाही. यासाठी वसुलीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन नाशिक जिल्हा बॅंकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी केले.

जिल्हा बॅंक वाचविण्यासाठी सरसावलेल्या बॅंक कर्मचाऱ्यांनी बँक वाचविण्यासाठी, बँकेची ढासळलेली आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी नाशिक डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को-ऑप. बँक एम्प्लाइज युनियनच्या वतीने शुक्रवार (ता. ५) जिल्हा बँक बचाव मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी चव्हाण बोलत होते.

याप्रसंगी शिखर प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे प्राचार्य बाळासाहेब देशमुख, सहकार तज्ज्ञ बाळासाहेब पतंगे, बॅंकिंग अभ्यासक सुभाष साळुंखे, महाराष्ट्र राज्य सचिव संघटनेचे अध्यक्ष विश्‍वनाथ निकम, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Nashik DCC Bank
Nashik DCC Bank : जिल्हा बॅंकेच्या नोटिसा बुडवल्या गोदावरी पात्रात

आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला वाचविण्यासाठी वसुलीवर भर देऊन वाढलेला एनपीए कमी करणे, नवीन वैयक्तिक सभासद वाढवून भागभांडवलात वाढ करण्याचा निर्धार जिल्हा बॅंक बचाव मेळाव्यात करण्यात आला.

Nashik DCC Bank
Nashik DCC Bank : दहा लाखांवर कर्ज थकलेल्या थकबाकीदारांवर कारवाई

आशिया खंडातील नावाजलेली जिल्हा बँक अनेक पुरस्कार प्राप्त मिळालेली बँक असताना ही बँक वाचविण्यासाठी बचाव मेळावा घ्यावा लागतो, अत्यंत दुःख वाटते. मात्र बॅंकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व सचिव कटिबद्ध असल्याची ग्वाही विश्‍वनाथ निकम यांनी दिली.

मेळाव्यास, संघटनेचे प्रदीप शेवाळे, साहेबराव पवार, मिलिंद देवकुटे, गोपीचंद निकम, नंदकुमार तासकर, सुभाष गडाख, मिलिंद पगारे, सचिव संघटनेचे अध्यक्ष देविदास नाठे, आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ गुंड यासह सचिव उपस्थित होते.

बँकेस पूर्वपदावर आणण्याचा कसोशीने प्रयत्न करावे

जिल्हा बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. यासाठी बँकेचे प्रशासक, सर्वच कर्मचारी, विविध कार्यकारी संस्थांचे सर्व सचिव वर्ग व सर्व घटकांच्या सहकार्याने भरीव कर्ज वसुली करून लवकरच बँकेस पूर्वपदावर आणण्याचा कसोशीने प्रयत्न करावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष रतन जाधव यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com