APMC Election : सर्वच राजकीय पक्षांच्या भूमिका गुलदस्‍त्यात!

ग्रामीण भागातील आर्थिक सत्ता केंद्रे असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, सोमवार (ता.२७) पासून अर्ज विक्री आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
apmc election
apmc electionAgrowon

Pune APMC Election : ग्रामीण भागातील आर्थिक सत्ता केंद्रे असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांची (APMC Election) रणधुमाळी सुरू झाली असून, सोमवार (ता.२७) पासून अर्ज विक्री आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जिल्हा आणि तालुका बाजार समित्यांसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार असून, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी आणि शिवसेना-भाजप अशी लढती होणार आहेत.

तर काही ठिकाणी काही पक्ष स्वतंत्र ताकद अजमावणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. पुणे (हवेली) बाजार समितीमध्ये अद्याप तरी महाविकास आघाडी आणि शिवसेना-भाजपने आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मेळावा घेतला आहे. मात्र त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही.

दरम्यान, अजित पवार यांनी बारामती बाजार समिती निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २७) मेळावा घेत, कार्यकर्त्यांना मुलाखती न घेता थेट उमेदवारांची यादीच देणार असल्याचे जाहीर करत धक्का दिला आहे.

यामुळे अनेक इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. मेळाव्यात बोलताना पवार म्हणाले, की आगामी कृषी उत्पन्न बाजार समिती व दूध संघाच्या निवडणुकीमध्ये काही नवीन तर काही जुन्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल.

apmc election
Pune APMC : पुणे बाजार समितीत कच्च्या पावत्यांवर व्यवहार

निवडणुकीतील उमेदवारांची यादी दिली जाईल, या वेळी मुलाखती घेणार नसल्याचे सांगत त्यांनी धक्का दिला. तर पक्ष संघटनेसाठी वेळ न देणाऱ्या पदाधिकऱ्यांना आपल्या शैलीत खडे बोल सुनावले.

आम्ही आमच्या कामासाठी वेळ देतो, पण काही पदाधिकारी झाल्यावर वेळ देत नाहीत व पक्षाच्या आंदोलन किंवा इतर उपक्रमाकडे पाठ फिरवतात. हे आता चालणार नाही.

प्रत्येकाने वेळ वाटून घ्यायला हवा. या पुढील काळात जे पदाधिकारी अशा उपक्रमांना येणार नाहीत त्यांची यादीच माझ्याकडे द्या, मी बघतो पुढे काय करायचे ते, अशा शब्दांत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

apmc election
Pune APMC : अडते असोसिएशनच्या बैठकीवरून आयोजनावरून तूं..तूं..मैं...मैं...

दरम्यान, जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या असलेल्या जुन्नर बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडीद्वारे लढण्याचे आमदार अतुल बेनके यांनी जाहीर केले असले तरी, आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने मात्र स्वबळाचा नारा दिला आहे.

याबाबत तालुकाप्रमुख माउली खंडागळे यांनी भूमिका जाहीर करताना म्हटले, की बाजार समितीच्या निवडणुकीचे धोरण ठरविण्यासाठी माझ्यासह संभाजी तांबे, बाबू पाटे, भास्कर गाडगे, रामभाऊ वाळुंज, प्रसन्न डोके व बाबा परदेशी या सात पदाधिकाऱ्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून निर्णय घेण्यात येणार आहे.

ही निवडणूक स्वबळावर लढवावी तसेच शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी असणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या निवडणुकीत आपण कोणाबरोबर जाण्यापेक्षा आपल्या बरोबर कोण येते आहे,

हेदेखील पाहावे कारण मतदार यादी पाहता शिवसेनेची ताकद चांगली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे येत्या दोन दिवसांत सर्व मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करू असे खंडागळे यांनी सांगितले.

जुन्नरसाठी दोन दिवसांत १८२ अर्जांची विक्री

जुन्नर बाजार समितीसाठी दोन दिवसांत १८२ अर्जांची विक्री झाली असून, १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

पुणे (हवेली) बाजार समितीसाठी अर्जांची विक्री

हवेली बाजार समितीसाठी दोन दिवसांत ०००० अर्जांची विक्री झाली असून, ००० अर्ज दाखल झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com