BJP:भाजपकडून एकाधिकारशाहीचा प्रयत्न: ठाकरे

राष्ट्रवादी (NCP)कुटुंबाचा पक्ष, काँग्रेस (Congress)भाऊ बहिणाचा पक्ष असून भाजपला (BJP)वंशवादाच्या विरोधात लढायचे असल्याचे नड्डा सांगतात. मात्र या सगळ्यामध्ये भाजपचा वंश पहिले कुठून सुरू झाला हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayAgrowon

भाजपला देशात केवळ एकाच पक्षाची सत्ता प्रस्थापित करायची आहे, त्यांना इतर सगळे पक्ष संपवायचे आहेत. भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या भाषणातून हे सगळे समोर आले आहे. नड्डा त्यांच्या भाषणात लोकशाही कुठे आहे? त्यांना इतर सगळे पक्ष संपवायचेत आणि एकच पक्ष ठेवायचा आहे. ही घातक मनोवृत्ती असल्याची टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना काल सक्तवसुली संचलनालयाने (ED) अटक केली असून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या कारवाईवर बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.ठाकरे पुढे म्हणाले की, नड्डांचे विधान हे देशाला हुकूमशाहीकडे नेणारे असून, ओडिसा, तेलंगणा, तामिळनाडूतील स्थानिक पक्ष संपवण्याची त्यांची मनीषा आहे.

महाराष्ट्रात शिवसेना ही संपण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी शिवसेना (Shivsena) संपवण्याचा प्रयत्न करून बघावा, असे आव्हान ठाकरे यांनी नड्डांना दिले.राष्ट्रवादी (NCP) कुटुंबाचा पक्ष, काँग्रेस (Congress) भाऊ बहिणाचा पक्ष असून भाजपला (BJP) वंशवादाच्या विरोधात लढायचे असल्याचे नड्डा सांगतात. मात्र या सगळ्यामध्ये भाजपचा वंश पहिले कुठून सुरू झाला हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण तेच म्हणतात की, इतर पक्षात काम केलेले लोक आपल्याकडे येत आहेत.

Uddhav Thackeray
Sanjay Raut: राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी

मग जर इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येणार असतील तर, मग भाजपचा वंश तरी नेमका कोणता हे तपासणे महत्त्वाचे आहे, असे ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी मराठी माणसाचा अपमान केला. त्यांच्या पोटातलं अनावधानाने ओठावर आले. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही त्यांच्या भाषणात भाजप (BJP) कशी एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे, हेही समोर आल्याचे ठाकरे यांनी नमूद केले.

मला संजयचा अभिमान

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील अटकेच्या कारवाईबाबत उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे यांनी, संजय राऊत हा माझा जुना मित्र आहे, त्याचा मला अभिमान आहे. त्याचा गुन्हा नसतानाही त्याला अटक करण्यात आली आहे. मरण आले तरी शरण जाणार नाही हे त्याचे वाक्य मला खूप आवडले, असे सांगितले.

Uddhav Thackeray
Sanjay Raut :नऊ तासांच्या चौकशीनंतर राऊत ईडीच्या ताब्यात

राऊतही शरण जाऊ शकत होते पण ते गेले नाहीत कारण ते एकनिष्ठ आहेत. त्याचबरोबर जे माझ्यासोबत आहेत ते दमदार आहेत आणि जे तिकडे गेले आहेत त्यांना तिकडे फक्त सत्तेचा फेस शिल्लक राहिल्यावर समजेल, असेही ठाकरे म्हणाले. शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सध्या होत आहेत पण ते होऊ शकत नाही, देशातील राजकारण आता घृणास्पद होऊ लागले असून याविरोधात समविचारी लोकांनी एकत्र यायला पाहिजे. तृणमूल काँग्रेसच्या ममता दीदी आहेत, तेलंगणाचे केसीआर आहेत, त्यांच्यासोबत संपर्क असल्याचेही ठाकरे म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com