केंद्राने खतांच्या किमती कमी कराव्या ः शेट्टी

रशिया व युक्रेनच्या युद्धामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
केंद्राने खतांच्या किमती कमी कराव्या ः शेट्टी
FertilizerAgrowon

कोल्हापूर : ‘‘रशिया व युक्रेनच्या युद्धामुळे (Russia Ukraine War) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर रासायनिक खतांचा तुटवडा (Fertilizer Shortage) निर्माण झाला आहे. तसेच कच्चा मालाच्या आयात निर्यातीच्या विस्कळितपणामुळे खतांचे दर गगनाला भिडू लागले आहेत. यामुळे देशातील शेतकऱ्यांचे शेतीचे बजेट कोलमडू लागले आहे. या साठी केंद्र सरकारने शेतीतील पुढील संकटे लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात,’’ असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju shetti) यांनी नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे झालेल्या राष्ट्रीय रासायनिक खत परिषदेत केले.

रूरल व्हाइस व सॅाक्रेटिस संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या या परिषदेस शेट्टी यांच्यासह अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक व्ही. एम. सिंग, योगेंद्र यादव, शेतकरी नेते राकेश टिकैत, अतुल अंजन, रामपाल जाट, काश्मीर (बारामुल्ला) चे शेतकरी यावर मीर, अनिल घुळी, आदित्य चौधरी यांच्यासह देशातील विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, ‘‘खरीप हंगामात खतटंचाई निर्माण झाल्यास त्याचा मोठा परिणाम बाजरी, कडधान्ये, तेलबिया उत्पादनावर होईल. गहू, तांदूळ यांचेही उत्पादन घटेल. या परिस्थितीचा अभ्यास करणाऱ्या देशांनी यापूर्वीच अन्नसाठे करण्यास सुरुवात केली आहे. जून-ऑक्टोबरचा खरीप हंगाम देशाच्या अन्नसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, या हंगामात अन्नधान्य, एक तृतीयांश कडधान्ये आणि सुमारे दोन तृतीयांश तेलबियांचे उत्पादन होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खतांची गरज भासणार आहे.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com