*/

Factory Election : ‘चोसाका’ निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला

चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीचा धुरळा चांगलाच उडणार असल्याचे संकेत आहेत. अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. १२ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
Factory Election
Factory ElectionAgrowon

चोपडा, जि. जळगाव : भाडेतत्त्वावर गेलेल्या चहार्डी (ता. चोपडा) येथील चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूक (Sugar Factory Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीचा धुरळा चांगलाच उडणार असल्याचे संकेत आहेत. अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. १२ फेब्रुवारीला मतदान (Voting) होणार आहे.

Factory Election
Sugarcane Cultivation : चोपडा तालुक्यात ऊस लागवड घटण्याची चिन्हे

सर्वपक्षीय नेत्यांनी ‘बारामती ॲग्रो’ ला कारखाना भाडेतत्त्वावर दिल्यानंतर २०२२-२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी कारखाना देखरेखीसाठी संचालक मंडळाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील यांचे सर्वपक्षीय ‘शेतकरी पॅनल’ उभे ठाकणार आहे. यासह राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसचेही पॅनल असण्याची शक्यता आहे.

आमदार लता सोनवणे यांचे तर भाजपचे पॅनेल तयार होण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करण्याची आजअखेर (ता.१२) मुदत आहे. उद्या (ता.१३) अर्जाची छाननी होईल. सोमवारी (ता.१६) यादी जाहीर होणार आहे. ‘चोसाका’ मध्ये वेगवेगळ्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना शेअर्स एकूण रक्कम १० हजार रुपये असलेले सूचक व अनुमोदकांची आवश्यकता आहे.

Factory Election
Sugar Industry : तेरा साखर कारखान्यांना मिळणार ९६ कोटींची थकहमी

पंधरा हजार मतदार

चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्यासाठी १५ हजार ४९ एकूण मतदार आहेत. २१ जागांसाठी निवडणूक होईल. त्यात १५ जागा ऊस उत्पादक मतदारसंघ, दोन जागा महिलांसाठी राखीव असतील.

दरम्यान, तसेच बिगर ऊस उत्पादक मतदारसंघ, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या व विमुक्त जाती- जमाती आणि विमाप्र, इतर मागास प्रवर्ग या गटात प्रत्येकी एक -एक उमेदवार असतील. बिगर ऊस उत्पादक मतदारसंघातील उमेदवारास ५९ संस्था प्रतिनिधी मतदान करतील.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com