Pandharpur Maghi Vari : पंढरपुरातील विषबाधित वारकऱ्यांची प्रकृती स्थिर

माघी एकादशी निमित्त पंढरपूर येथील सदर मठात नांदेड, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांतून वारकरी भाविक आले होते.
Maghi Vari
Maghi Vari Agrowon

Pandharpur News ः संत निळोबा महाराज सेवा मंडळ त्यागमूर्ती बबन महाराज भक्त सदन, पंढरपूर येथील १३७ वारकरी भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सर्व भाविकांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

माघी एकादशी निमित्त पंढरपूर (Maghi Vari) येथील सदर मठात नांदेड, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांतून वारकरी भाविक आले होते. बुधवारी रात्री आठ ते नऊ या कालावधीत एकादशी फराळाच्या जेवणात भगर, आमटी व पाणी हे पदार्थ खाल्याने १३७ भाविकांना अन्नातून बाधा झाली.

त्यांना उलटी, मळमळ, पोटदुखी, चक्कर आदी लक्षणे जाणवल्याने तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेत असलेल्या भाविकांची प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.

या वेळी त्यांच्या समवेत तहसीलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त सुनील जिंतूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बागडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले उपस्थित होते.

Maghi Vari
Government Fund : सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देऊ
संबंधित ठिकाणच्या जेवणातील सर्व पदार्थांचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून घेण्यात आले असून, ते नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत.
गजानन गुरव, प्रातांधिकारी, पंढरपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com