देश ‘अमृत महोत्सवा’त व्यस्त, मेळघाट पाणीटंचाईने त्रस्त

एक टँकरमध्ये ५ हजार लिटर पाणी येते. आणि विहिरीत ते पाणी घातले, की अर्ध्या तासाच्या संपून जाते. कित्येकांना तर पाणी मिळतच नाही. मग अशावेळी ज्यांच्याकडे साधने आहेत ती मोठे ड्रम वैगेरे घेऊन आपल्या वाहनाने ६-७ किमी दूर अंतरावरील गावातून पाणी आणतात.
देश ‘अमृत महोत्सवा’त व्यस्त, मेळघाट पाणीटंचाईने त्रस्त
Water ScarcityAgrowon

अमरावती : विदर्भातील नंदनवन म्हणून प्रख्यात असलेले चिखलदरा हे पर्यटन स्थळ. मात्र या मेळघाट मागे एक वास्तव लपलेले आहे ते म्हणजे भीषण पाणीटंचाईचे. विविधतेने नटलेल्या या प्रदेशातील तब्बल दोनशेहून अधिक गावे ही तीव्र पाणीटंचाईने ग्रस्त आहेत.

खडीमाल हे गाव अमरावती धारणी मार्गावरून सेमाडोह येथून साधारणतः ४० किमी आत डोंगर दऱ्यांच्या कुशीत बसलेले. या गावाची लोकसंख्या जवळपास १५०० असून, एकूण घरे ३११ आहेत. या गावाला जाण्याकरिता डोंगर घाटांचा रस्ता असून, थोड्या दूरपर्यंत डांबरीकरण, सिमेंटचा तर मोठ्या प्रमाणात गिट्टीचा कच्चा रस्ता आहे. या गावाला कोणतेही वाहतुकीचे साधन नसून, नागरिकांना खासगी वाहनाशिवाय पर्याय नाही.

या गावातील मुख्य समस्या पाणीटंचाई आहे. देश स्वतंत्र्य झाल्यापासून या गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दिवाळीनंतर म्हणजेच साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापासून तिथे पाणीटंचाई निर्माण होत असते. तर फेब्रुवारी महिन्यापासून, येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गावात चार विहिरी. यातील दोन गावांत, तर दोन शेतरानात. मात्र या चारही विहिरींना पाणी नाही. सोबतच गावात येते वेळेस लागत असलेल्या विहिरीजवळ एक कूपनलिका (हापसी/हॅण्डपंप) आहे. ती सुद्धा कित्येक वर्षांपासून बंद आहे.

एक टँकरमध्ये ५ हजार लिटर पाणी येते. आणि विहिरीत ते पाणी घातले, की अर्ध्या तासाच्या संपून जाते. कित्येकांना तर पाणी मिळतच नाही. मग अशावेळी ज्यांच्याकडे साधने आहेत ती मोठे ड्रम वैगेरे घेऊन आपल्या वाहनाने ६-७ किमी दूर अंतरावरील गावातून पाणी आणतात. परंतु ज्यांच्याकडे वाहने नाहीत, ते पायी ३ किमी दुरून डोंगरदऱ्या चढून- उतरून नदी- नाल्यात असलेल्या झऱ्यातून पाणी आणतात. ही तिथे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत दोन-तीन हांडे डोक्यावर घेऊन डोंगर चढत पाणी आणावे लागते.

डोंगराळ व उंचसखल टणक काळ्या दगडाचा भूभाग

मेळघाट हा भाग डोंगराळ व उंचसखल टणक काळ्या दगडाचा असा भूभाग आहे. या भागात घनदाट जंगल असल्यामुळे पाऊस मोठ्या प्रमाणात होतो. परंतु डोंगरमाथ्याला भाग असल्याने या ठिकाणी जेवढा पाऊस होतो ते पावसाचे पाणी या भागातून वाहून जाते. या पाण्याचा फायदा पायथ्याशी असलेल्या अचलपूर, चांदूरबाजार, दर्यापूर, अंजनगाव या भागाला होतो. पावसाचे जेवढे पाणी विहिरीत जमा होते ते कसेबसे जानेवारी महिन्यापर्यंत पुरते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com