Crop Damage : खानदेशात पीकहानीचे आकडे वाढतेच

खानदेशात ४ ते ७ मार्च, ९ ते १७ मार्च आणि ४ एप्रिल ते २० एप्रिल या दरम्यान झालेला वादळी पाऊस, गारपिटीत तब्बल दीड लाख हेक्टरवरील पिकांना कमी अधिक फटका बसला आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Jalgaon News खानदेशात ४ ते ७ मार्च, ९ ते १७ मार्च आणि ४ एप्रिल ते २० एप्रिल या दरम्यान झालेला वादळी पाऊस, गारपिटीत (Hailstorm) तब्बल दीड लाख हेक्टरवरील पिकांना कमी अधिक फटका बसला आहे. केळी बागांची (Banana Orchard) पाने पूर्णतः फाटून घड पक्व होण्यास विलंब लागत आहे. पण या नुकसानीबाबत पीकविमा कंपनी दखल घ्यायला तयार नाही.

Crop Damage
Crop Damage : कांद्यासह भाजीपाला पिकांना फटका

केळी बागा जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा भागात काही क्षेत्रांत आडव्या झाल्या. १०० टक्के केळी बागांची पाने सुसाट वारा, वादळ व हलक्या गारपिटीत फाटली आहेत.

यासंबंधी नुकसान भरपाईची तरतूद करण्याच्या सूचना तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केल्या होत्या.

विमा कंपनीशी त्याबाबत पत्रव्यवहार झाला आहे. परंतु विमा कंपनीने फाटलेल्या केळी पानांबाबत पंचनामे, नुकसानीची आकडेवारी तयार करणे किंवा भरपाईसंबंधी दखल घेतलेली नाही.

शासकीय यंत्रणांनी देखील केळी बागांच्या नुकसान भरपाईसंबंधी हालचाली केलेल्या नाहीत. पाने फाटल्याने बागांची वाढ कमी झाली आहे. झाडांना मोठी हानी पोहोचली आहे. ऊन तापत असल्याने त्यात तग धरण्यासाठी मजबूत, अखंड पाने महत्त्वाची ठरतात. परंतु पानेच खराब झाल्याने समस्या बिकट बनली आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Crop Damage
Crop Damage : गव्यांच्या संचारामुळे स्ट्रॉबेरीसह शेतीचे नुकसान

मार्चमध्ये खानदेशात सुमारे ५० हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला. या महिन्यात अधिकचा फटका बसला आहे.

परंतु काही भागात पिकांचे अंशतः नुकसान झाले आहे. हे नुकसान शासकीय आकडेवारीत दिसत नाही. मका, बाजरी लोळली. पण त्यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान न दिल्याने त्याची दखल यंत्रणांनी घेतली नाही.

परंतु लोळलेली पिके पूर्णतः हातची गेली. त्यांचा चाराही हाती येत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे आतापर्यंत खानदेशात फक्त ७० ते ७५ हजार हेक्टरवरील पिकांचेच नुकसान झाल्याचा दावा कृषी यंत्रणा करीत आहेत.

यंत्रणा सुट्टीवर...

अक्षय तृतीया, शनिवार व रविवारची सुट्टी सलग आली. यामुळे कृषी व महसूल यंत्रणा सुट्टीवर आहे. यातच अनेक तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्या बदल्या झाल्या आहेत. काही अधिकारी रुजू झालेले नाहीत. यामुळे पंचनामे व इतर कामे ठप्प आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांना वास्तुस्थितिदर्शक पंचनामे व इतर बाबींची प्रतीक्षा आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com