Maharashtra Crisis: सत्तासंघर्षावर ‘तारीख पे तारीख’

१२ ऑगस्ट रोजी सुनावणी होईल, असे वाटत असतानाच ही २२ ऑगस्ट रोजी सुनावणीची नवीन तारीख आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या (Shivsena) गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Thackeray & Shinde
Thackeray & ShindeAgrowon

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू असलेली सुनवाणीची तारीख पुन्हा पुढे ढकलली असून २२ ऑगस्ट रोजी ही सुनावणी होणार आहे. ही सुनावणी आधी ८ ऑगस्ट रोजी होणार होती. ती पुढे ढकलून १२ ऑगस्ट रोजी सुनावणीची तारीख दिली होती.

मुख्यमंत्री शिंदे गटाने शिवसेनेत (Shivsena) बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासोबत अन्य सहा याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर एकत्र सुनावणी सुरू आहे.

Thackeray & Shinde
Cotton Production:दर्जेदार कापूस उत्पादनात हेच ध्येय

सर्वोच्च न्यायालयातील याचिकांमुळे राज्य मंत्रिमंडळांचा विस्तारही रखडला होता. मात्र, आठ तारखेची सुनावणी पुढे ढकलल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार केला.

Thackeray & Shinde
राज्यात चिकनच्या प्रतिकिलो दरात सुधारणा

१२ ऑगस्ट रोजी सुनावणी होईल, असे वाटत असतानाच ही २२ ऑगस्ट रोजी सुनावणीची नवीन तारीख आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे २७ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीआधी या प्रकरणाचा निकाल लागतो की, घटनापीठ (Constitution Bench) स्थापन होते याबाबत उत्सुकता लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com