Agriculture Produce : भारतीय शेतीमालाला जगातील बाजारात मागणी आशादायक

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय निविष्ठांना चांगली मागणी असून, हे आशादायक चित्र आहे.
International Market
International MarketAgrowon

अकोला ः आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) भारतीय निविष्ठांना चांगली मागणी असून, हे आशादायक चित्र आहे. शेतकरीसुद्धा आधुनिक पद्धतीने सेंद्रिय निविष्ठांचे (Organic Input) उत्पादन करीत असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (PDKV) कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

International Market
Crop Damage Compensation : मिळालेली भरपाईची मदत ‘ना थरीची, ना भरीची’

कृषी विद्यापीठ व इकोसर्ट फ्रान्स यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर सेंद्रिय प्रमाणीकरण पदविका अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीची सुरुवात करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. श्यामसुंदर माने, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे,

कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुधीर वडतकर, इकोसर्टच्या प्रशिक्षण सल्लागार श्रीमती रोझेन रिचार्डू, विभागीय बीज प्रामाणिकरण अधिकारी पुरुषोत्तम उन्हाळे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, अभ्यासक्रम संचालक डॉ. आदिनाथ पासलावार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. इकोसर्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जाधव व माजी कुलगुरू डॉ. विलास भाले आभासी पद्धतीने सहभागी झाले होते.

International Market
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

सेंद्रिय प्रामाणीकरण पदविका अभ्यासक्रमाच्या माध्यमातून देशभरातील युवक युवतींना व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचेही डॉ. गडाख म्हणाले. डॉ. भाले म्हणाले, की आधुनिकीकरणाच्या या कालखंडात वाढत्या लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य निर्मितीमध्ये हरितक्रांतीच्या माध्यमातून अधिक उत्पादन देणारे संकरित वाण व रासायनिक निविष्ठांचा वापर वाढत पारंपरिक सेंद्रिय शेती व्यवसायात झालेली घट आता भरून निघत आहे.

राज्यातील या पहिल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या सुपर ३० बॅचमधील पदविकाधारक हे राजदूत म्हणून भविष्यात कार्य करतील, असा आशावाद श्री. जाधव यांनी व्यक्त केला. श्रीमती रोझेन रिचार्डू, डॉ. शामसुंदर माने यांचीही समयोचित भाषणे झाली. इकोसर्टचे डॉ. प्रणिता आसवले, डॉ. प्रवीण खरे व हेमंत यांनी मार्गदर्शन केले. डॉ. पसलावार यांनी प्रास्ताविक केले. उद्‌घाटन सत्राचे सूत्रसंचालन सहयोगी कोर्स डायरेक्टर डॉ. नितीन कोंडे यांनी केले. प्रा. डॉ. नीरज सातपुते यांनी आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com