
नगर ः संगमनेरमध्ये सर्वांना बरोबर घेत तालुक्याच्या विकास साधला आहे. त्यामुळे तालुका विकास कामातील सातत्य, सुसंस्कृत राजकारण, समाजकारण, प्रगती यामुळे राज्यात आदर्शवत ठरला आहे. मात्र हा संगमनेरचा विकास काहींना पाहवत नसल्याने त्यांचा त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावाच्या, तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे मत माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केले.
संगमनेर येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहात संगमनेर तालुक्यातील नवनिर्वाचित २९ सरपंच व ३७ ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सदस्यांचा आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजित भाऊ थोरात, तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, शंकर पाटील खेमनर, डॉ. जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, संपतराव डोंगरे, रामदास पाटील वाघ, मिलिंद कानवडे, संतोष हासे, नानासाहेब शिंदे, चंद्रकांत कडलग, गणपतराव सांगळे, सुरेश थोरात, सोमेश्वर दिवटे, सुभाष सांगळे, पद्माताई थोरात, सीताराम राऊत, संपतराव गोडगे आदी उपस्थित होते. या वेळी सत्कार आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.
थोरात म्हणाले, की ग्रामपंचायत हा राजकारणाचा पाया आहे. आपण कधीही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सहभाग घेतला नाही. तरीही तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी मोठे यश मिळवले आहे. निवडणूक ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. मात्र निवडणुकीनंतर सर्वांनी विकास कामासाठी एकत्र आले पाहिजे. ही संगमनेर तालुक्याची परंपरा आहे. आपल्या महसूल मंत्रिपदाच्या काळात अत्यंत चांगले काम केले. अनेकांना मदत केली. याचबरोबर आपण निळवंडे कालव्यासाठी व तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी आणला
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.