Agricultural Festival : सोलापुरात जिल्हास्तरीय कृषी महोत्सव पाच ते नऊ मार्चदरम्यान भरणार

कृषी महोत्सव नियोजनासंदर्भात नुकतीच प्राथमिक बैठक झाली. या बैठकीत विविध समित्यांचे गठन करण्यात आले. तसेच सदस्यांच्या जबाबदाऱ्या निश्‍चित करण्यात आल्या.
Agricultural Festival
Agricultural FestivalAgrowon

Solapur News : येत्या पाच ते नऊ मार्च दरम्यान जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने योगदान द्यावे, अशा सूचना आयोजन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind sambharkar) यांनी दिल्या.

मंगळवेढा रस्त्यावरील लक्ष्मी विष्णू मिल मैदान येथे होणाऱ्या या महोत्सवात कृषी प्रदर्शनासह विविध परिसंवाद, चर्चासत्रे, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री सुविधा, विक्रेता खरेदीदार संमेलन यांच्यासह जिल्ह्यातील कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले शेतकरी व पीकस्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

Agricultural Festival
Agricultural Festival : नांदेडमध्ये जिल्हास्तरीय कृषी महोत्सव

त्याशिवाय कृषिविषयक तंत्रज्ञानाचा प्रसार, शासकीय योजनांची माहिती देणे, शेतकरी–शास्त्रज्ञ संशोधन–विस्तार प्रक्रिया व विपणन साखळी निर्माण करणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री शृंखला आदी या महोत्सव आयोजनाचा हेतू असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

कृषी महोत्सव तयारी बैठकीत आढावा

कृषी महोत्सव नियोजनासंदर्भात नुकतीच प्राथमिक बैठक झाली. या बैठकीत विविध समित्यांचे गठन करण्यात आले. तसेच सदस्यांच्या जबाबदाऱ्या निश्‍चित करण्यात आल्या.

कृषी तसेच अन्य विभागांतील नावीन्यपूर्ण व महत्त्वाच्या योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देऊन प्रदर्शन मांडणीपासून यशस्वी करण्यापर्यंतची प्रक्रिया याबाबतचे नियोजन करण्यात आले.

Agricultural Festival
Agriculture Department : शिवारातले कृषी कर्मचारी परीक्षा केंद्रात नेमणुकीस

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक मदन मुकणे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार आदीसह समितीचे सदस्य, कृषी विज्ञान केंद्राचे संशोधक, महाबीज, जिल्हा अग्रणी बँक, माविम, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com