G - 20 Shikhar Parishad : जी-२० शिखर परिषदेच्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

देशात पुढील वर्षी होत असलेल्या जी-२० या राष्ट्रसमूहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनात औरंगाबादचाही सहभाग असणार आहे.
G - 20 Shikhar Parishad
G - 20 Shikhar ParishadAgrowon

औरंगाबाद : देशात पुढील वर्षी होत असलेल्या जी-२० (G - 20) या राष्ट्रसमूहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनात औरंगाबादचाही सहभाग असणार आहे. जी-२० मध्ये सहभागी प्रतिनिधी १३ व १४ फेब्रुवारी २०२३ रोजी औरंगाबाद येथील विविध स्थळांना भेटी देणार आहेत. या परिषदेच्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी (ता. १४)आढावा घेतला.

विभागीय आयुक्त कार्यालयात जी-२० शिखर परिषदेच्या नियोजनासाठी पूर्वतयारी बैठकीस जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया आदी उपस्थित होते.

G - 20 Shikhar Parishad
5 G India : 5G मुळे गावागावांत क्रांती होणार ः नरेंद्र मोदी

जी-२० परिषदेचे सहभागी प्रतिनिधी १३ व १४ फेब्रुवारी २०२३ रोजी औरंगाबाद शहराला भेट देणार आहेत. वेरूळ, अजिंठा, दौलताबाद येथील पर्यटन तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीचीही पाहणी करणार आहेत. जगभरातील सुमारे ५०० प्रतिनिधी औरंगाबाद येथे भेट देणार आहेत. या प्रतिनिधींच्या निवास, सुरक्षा, वाहतूक तसेच इतर अनुषंगिक व्यवस्थेबाबत विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी आढावा घेतला.

G - 20 Shikhar Parishad
Alibag च्या White onion ला मिळाला G I टॅग | ॲग्रोवन

या परिषदेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर औरंगाबाद शहराची आकर्षक पद्धतीने प्रतिमा निर्मिती होणार आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांनी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्याच्या सूचनाही दिल्या. या वेळी विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com