कर्जतच्या राजनाल्याची पडझड

तालुक्यातील दुबार भातशेतीसाठी राजनाला हा वरदान ठरत आहे. काही वर्षांपासून या नाल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होत आहे.
Rice farming
Rice farmingAgrowon

कर्जत : तालुक्यातील दुबार भातशेतीसाठी (Rice ) राजनाला हा वरदान ठरत आहे. काही वर्षांपासून या नाल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होत आहे. दुबार भातशेतीसाठी पाटबंधारे विभागाकडून (Irrigation Department) राजनाल्यातील पाणी डिसेंबरच्या मध्यापासून चार महिने सोडले जाते. त्यावरच शेती बहरते.

Rice farming
Rice : ‘आसावरी’ चे संशोधन भारी

त्यामुळे सध्या राजनाल्याची डागडुजी अत्यावश्‍यक झाली असून पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.फार पूर्वी बांधण्यात आलेल्या राजनाल्याचे बांधकाम मातीचे होते. तरीसुद्धा शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचून सर्व क्षेत्र ओलिताखाली आणले जायचे. आठ ते नऊ वर्षांपूर्वी तब्बल ७० कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करून या राजनाल्याचे बांधकाम सिमेंट काँक्रीटमध्ये करण्यात आले. 

Rice farming
Paddy Procurement : शहापूरमध्ये दहा भात खरेदी केंद्रांना मंजुरी

मात्र, काम तंत्रशुद्ध पद्धतीने केले नसल्याने काही भागांत मुख्य नाला खाली, तर त्याला जोडणारे उपनाले तथा कालवे वर बांधले आहेत. याशिवाय, नाल्याची दुरुस्ती, साफसफाई वेळेवर केली जात नसल्यानेही पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होत आहे. तालुक्यातील दुबार भातशेतीसाठी राजनाला कालव्यातून दरवर्षीप्रमाणे १५ डिसेंबरला पाणी सोडण्यात येते. त्यानंतर १५ एप्रिलला ते बंद केले जाते.

मात्र, मुख्य राजनाला कालव्याची पडझड झाल्याने आणि कालव्याच्या उपकालव्यांचे काम तंत्रशुद्ध पद्धतीने न झाल्याने हे पाणी सर्व गावांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आतापासून राजनाला कालवा दुरुस्तीचे काम सुरू केल्यास १५ डिसेंबरपर्यंत पाणी सोडण्याअगोदर नाल्याचे काम पूर्ण होऊ शकते. ही बाब सामाजिक कार्यकर्ते अरुण देशमुख यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

आठवडाभरात राजनाला डागडुजीचे काम आणि साफसफाईसाठी मशिनरी येणार आहे. १५ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण केले जाणार असून दुरुस्तीनंतर पाणी सोडण्यात येईल.

- भरत गुंटूरकर, अभियंता,

पाटबंधारे विभाग, कर्जत

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com