Electricity : आदिवासी नागरिकांची विजबिले झाली कमी

किसान सभेने केली होती मागणी; पुन्हा विजबिले जास्त आल्यास होणार आक्रमक
Electricity
ElectricityAgrowon

पुणे : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात (Tribal Area) रीडिंग न घेता चुकीच्या पद्धतीने भरमसाट विजबिले (Electricity Bill) नागरिकांना दिली जात होती. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभा (Kisan Sabha), आंबेगाव तालुका समितीच्यावतीने वीज विभागाच्या या गलथान कारभाराविरोधात तळेघर या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा दिल्यानंतर वीज विभागाचे प्रतिनिधी बाजाराच्या दिवशी उपस्थित राहून सुमारे दोनशेपेक्षा अधिक नागरिकांची वीज बिले नुकतीच कमी करण्यात आली आहेत, अशी माहिती किसान सभेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे यांनी दिली.

Electricity
Electricity : पोखरा प्रकल्पातील गावांना २४ तास वीजपुरवठा द्या

किसान सभेच्या या निवेदनाची दखल घेत, सहाय्यक अभियंता शैलेश गिते यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून संघटनेच्या मागण्या मान्य केल्या असून तसे लेखी संघटनेस दिले. यामध्ये ज्या प्रमुख मागण्या मान्य झाल्या झाल्या असून कमी केलेली वीज बिले पुन्हा जास्त आली तर किंवा तळेघर सारखेच अडविरे व डिंभे येथेही किसान सभा पुन्हा आंदोलन करणार आहे, असे किसान सभेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Electricity
Agriculture Electricity : कृषिपंपांची नादुरुस्त रोहित्रे बदला, नवी वीजजोडणी द्या

यावेळी किसान सभेचे राज्य समिती सदस्य अशोक पेकारी, आंबेगाव तालुका किसान सभेचे अध्यक्ष नंदा मोरमारे, सचिव रामदास लोहकरे, तालुका समिती पदाधिकारी सुभाष भोकटे, देविका भोकटे, दत्ता गिरंगे, अशोक जोशी, लक्ष्मण मावळे, अशोक पारधी उपस्थित होते.

Electricity
Agriculture Electricity : दिवसभर राबा, रात्री पाण्यासाठी जागा

किसान सभेला देण्यात आलेले आश्वासने :

- भरमसाट विजबिले तातडीने कमी करून दिली जातील.

- रिडिंगनुसारच वीजबिल दिले जातील व नियमित रीडिंग घेतली जाईल.

- ज्या ग्राहकांचे मीटर नादुरूस्त आहेत, ते पैसे न घेता नवीन मीटर मोफत दिले जातील.

- आदिवासी भागातील वीज ग्राहकांना वाढीव बिल आले, तर घोडेगाव येथे जाऊन कमी करावे लागत होते.

- येथून पुढे वीज बिले आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तळेघर, अडविरे, डिभे, या गावाच्या ठिकाणी, बाजारच्या दिवशी वीज अधिकारी उपलब्ध असतील तेथे वीजबिले दुरुस्त करून दिले जातील.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com