बैलाला वाचवताना शेतकऱ्याचा गेला जीव

किटाळी येथील शेतकरी सीताराम नन्नावरे हे बैलांना हेटी शेतशिवारात चारण्याकरिता घेऊन गेले. दरम्यान, दुपारी चार वाजताच्या सुमारास वाघाने (Tiger) आधी बैलजोडीवर हल्ला केला. एका बैलास ठार केले.
Tiger
TigerAgrowon

चिमूर, जि. चंद्रपूर ः बैलजोडी चारण्यासाठी घेऊन गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. सीताराम रामजी नन्नावरे (वय ७०, रा. किटाळी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वाघाने (Tiger) एका बैलालाही ठार केले. ही घटना खडसंगी वनपरिक्षेत्र किटाळी बिट अलिझंजा कक्ष क्रमांक ३९० मध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, किटाळी येथील शेतकरी सीताराम नन्नावरे हे बैलांना हेटी शेतशिवारात चारण्याकरिता घेऊन गेले. दरम्यान, दुपारी चार वाजताच्या सुमारास वाघाने (Tiger) आधी बैलजोडीवर हल्ला केला. एका बैलास ठार केले.

दुसऱ्या बैलावर हल्ला करीत असताना नन्नावरे यांनी प्रतिकार केला. यामुळे वाघाने बैलास सोडून सीताराम नन्नावरे यांच्यावर हल्ला केला. हा प्रकार लक्षात आल्याने जवळील शेतकरी, शेतमजुरांनी धाव घेतली असता वाघ जंगला दिशेने पळून गेला.

माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण कर्मचाऱ्यांसह घटनास्थळावर पोहोचले. वन विभागाद्वारे तातडीची ५० हजार रुपयांची मदत मृताची पत्नी पार्वताबाई सीताराम नन्नावरे यांना वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com