Raju Shetti : ‘शेतकरी जगला पाहिजे’ही भावना कौतुकास्पद

शेतकरी जगला पाहिजे ही भावना आजच्या युवा पिढीमध्ये असणे कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांसाठी सुरू असलेलं काम वाखाणण्याजोगे आहे.
Raju Shetti
Raju ShettiAgrowon

Pune News : ‘‘शेतकरी जगला पाहिजे ही भावना आजच्या युवा पिढीमध्ये असणे कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांसाठी सुरू असलेलं काम वाखाणण्याजोगे आहे. शेतकऱ्यांप्रती असलेली ही भावना एक दिवस सत्यात उतरेल.

त्यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्याने ‘शेतकरी आत्महत्या शोध आणि बोध’ हे पुस्तक वाचायलाच हवं. हे पुस्तक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आणि दिशादर्शक असेल, असे उद्गार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी काढले.

विनायक हेगाणा लिखित ‘शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) शोध आणि बोध’ या पुस्तकाचे प्रकाशन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार शेट्टी (Raju Shetti) यांच्या हस्ते मराठा चेंबर येथील सुमंत मुळगावकर ऑडिटोरियम पुणे येथे रविवार (ता. १९) करण्यात आले. या वेळी श्री. शेट्टी बोलत होते.

या वेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad), शांतीवनचे कावेरी नागरगोजे, पुस्तकाचे लेखक विनायक हेगाणा, आमदार डॉ. विश्वजीत कदम, खासदार ओमराजे निंबाळकर, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, आमदार कैलास पाटील आदी उपस्थित होते.

श्री. शेट्टी म्हणाले की, सामाजिक बांधिलकी आणि शेतकरी जगला पाहिजे या उद्देशाने करत असलेल्या कामाला लागेल ती मदत यापुढे करण्याचे काम आम्ही मान्यवर करू. ज्या ज्या वेळी अडचणी येतील त्या अडचणीतून सोबत मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.

तसेच यापुढे राज्यात एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही, यासाठी आम्ही आमच्या परीने विनायकच्या सोबत काम करणार आहोत. हे पुस्तक शेतकऱ्यांना नक्कीच बळ देईल आणि शेतीमध्ये नवीन क्रांती घडेल.

Raju Shetti
Raju Shetty : ‘स्वाभिमानी’चा बुधवारी राज्यव्यापी ‘चक्का जाम : राजू शेट्टी

गेली अनेक वर्षे मी चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

पण कोल्हापूर सारख्या सदन जिल्ह्यातील माझ्याच तालुक्यातील एक युवक विद्यार्थी दशेत असताना समाजकारणाचा कोणताही वारसा नसताना शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजेत. हे स्वप्न उराशी बाळगून तो मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात काम करत आहे. याचा मला अभिमान आहे.

एक युवक शेतकऱ्यांच्या जागेवर जाऊन त्यांना असणाऱ्या अडचणी, समस्या याचा ठाव घेऊन त्या मार्गी लावण्याचे काम करत आहे. त्याची शेतकरी जगला पाहिजे ही सुरू असलेली धडपड एक दिवस नक्तीच सत्यात उतरेल.

Raju Shetti
Raju Shetti : राजू शेट्टींचा सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा

राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, कृषीप्रधान देशात शेतकरी आत्महत्या ही चिंतेची बाब असून महाराष्ट्र शंभर टक्के आत्महत्या मुक्त व्हावा, यासाठी विनायक करत असलेलं काम अभिमानास्पद आहे. त्याचे हे स्वप्न एक दिवस नक्कीच पूर्ण होईल हे पुस्तक त्याचाच एक भाग आहे.

या पुस्तकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन ऊर्जा मिळेल. दरम्यान, शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत पण त्या प्रश्नांची उत्तर अद्यापही त्याला मिळालेली नाहीत.

पण ‘शेतकरी आत्महत्या शोध आणि बोध’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील. तसेच येणाऱ्या संकटांना धाडसाने सामोरे जात त्यावर मात करत आत्मनिर्भर बनतील आणि एक दिवस संपूर्ण महाराष्ट्र आत्महत्या मुक्त होईल.

खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, आत्महत्या ही एका दिवसाची प्रक्रिया नसून अनेक दिवसांपासून त्याच्या मनात घोंगावत असलेलं विचारांच वादळ एक दिवशी आत्महत्या करायला भाग पाडतं.

पण आत्महत्या करण्याआधी त्याच्या भावना, समस्या जाणून घेणे गरजेचे असतं ज्यावेळी त्याच्या समस्या जाणून घेतल्या जातील आणि त्यावर मार्ग शोधला जाईल. त्यावेळी तो आत्महत्या न करता त्या समस्यांना धैर्याने सामोरे जाईल. त्यामुळे शेतकऱ्याला समजून घेणे गरजेचे आहे.

तसेच हे पुस्तक शेतकऱ्यांना नक्कीच बळ देणार असेल त्यामुळे प्रथम शेतकऱ्याने हे पुस्तक वाचायला हवं ज्यावेळी शेतकरी हे पुस्तक वाचेल तेव्हा भविष्यात येणाऱ्या संकटांना निडरपणे सामोरे जाईल आणि शेती क्षेत्रात नक्कीच आधुनिक क्रांती करेल. प्रास्ताविक विनायक हेगाना यांनी प्रास्ताविक केले. तर राहुल बिराजदार यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com