आसाममधील पूरस्थिती गंभीरच

गेल्या काही दिवसांपासून पंपाद्वारे पुराचे पाणी भारलू नदीत सोडले जात असले तरी आज ते सोडता आले नाही. मात्र, त्यामुळे शहरात नवीन भागांत पूरस्थिती निर्माण झाली.
आसाममधील पूरस्थिती गंभीरच
Aasam FloodAgrowon

गुवाहाटी (वृत्तसंस्था) : ईशान्येकडील आसाम राज्यातील पूरस्थिती (Flood) रविवारीही (ता.१९) अत्यंत गंभीर होती. संततधार पावसामुळे अनेक नवीन भाग जलमय झाले.

शनिवारी (ता.१८) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आसामची राजधानी गुवाहाटीत अक्षरश: हाहाकार उडाला. शहरातील अनेक भागांत गुडघाभर पाणी साचले. काही ठिकाणी तर छातीइतक्या उंचीपर्यंत पाणी साचले होते. गुवाहाटी महापालिकेचे आयुक्त देवाशिष शर्मा यांनी सांगितले, की अप्पर आसाममधील मुसळधार पाऊस व ब्रम्हपुत्रा नदीतील अतिरिक्त पाण्यामुळे गुवाहाटीत ब्रम्हपुत्रेच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली.

नदीचे गुवाहाटीत येणारे पाणी रोखण्यासाठी प्रशासनाने ब्रम्हपुत्रेची उपनदी भारलूवरील दारे बंद केली. गेल्या काही दिवसांपासून पंपाद्वारे पुराचे पाणी भारलू नदीत सोडले जात असले तरी आज ते सोडता आले नाही. मात्र, त्यामुळे शहरात नवीन भागांत पूरस्थिती निर्माण झाली.

आसाममध्ये गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस व दरडींमुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील ३० लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. एकूण ११८ महसूल मंडळांचा समावेश असणाऱ्या ३२ जिल्ह्यांतील ४,२९१ गावांना पुराचा वेढा पडला आहे. दरम्यान, पुरामुळे आणखी आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे आसाममध्ये पूर व दरडीमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ६२ वर गेली आहे. आसाममधील दिमा हसाओ, गोलपारा, कामरूप आदी जिल्ह्यांत नव्याने दरडी कोसळल्याचे वृत्त आहे.

मदत छावण्यांमध्ये आश्रय न घेतलेल्या लोकांनाही जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी, ३०२ मदत केंद्रे तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली. पूरग्रस्त भागांतून लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलही मदत करत आहे. आसाममध्ये आतापर्यंत २० हजारांहून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

आकडे बोलतात...

पुरामुळे मृत्यू -६२

नागरिकांना फटका-३१ लाख

एकूण मदत छावण्या- ५१४

मदत छावण्यांतील नागरिक-१.५६ लाख

प्रभावित गावे-४,२९१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com