हरियाना शेतकऱ्यांना का देतंय १० हजारांची मदत?

देशात चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तर काही राज्यांत गोवंश हत्याबंदीमुळे मोकाट जनावरांसाठी चारा मिळणे दुरापस्त झाले.
हरियाना शेतकऱ्यांना का देतंय १० हजारांची मदत?
fodderagrowon

1. बंगालच्या उपसागरात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या म्हणजेच मॉन्सूनच्या आगमनास पोषक हवामान होतंय. त्यामुळं उद्या दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि लगतच्या उपसागरात मॉन्सून दाखल होण्याची शक्यताये. तसंच अंदमान निकोबार बेटांवर जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवलीये.तर ‘असानी’ चक्रीवादळ निवळताच राज्याच्या बहुतांश भागात निरभ्र आकाश झालंय. त्यामुळं उन्हाची ताप पुन्हा वाढू लागलीये. उद्या विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आलाय. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका वाढणारे.

2. सिंदी रेल्वे बाजार समितीअंतर्गत येत असलेल्या सेलू उपबाजारात कापसाला या हंगामातील उच्चांकी दर मिळालाय. शनिवारी सेलू बाजारात कापसाचा (Cottonकमाल दर १४ हजार ३६५ रुपये प्रति क्विंटलचा मिळाला. बाजारात ५०० क्विंटल कापसाची आवक झाली होती. त्यातील फक्त १५ क्विंटल कापसाला हा उच्चांकी दर मिळाल्याचं बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितलं. पश्चिम विदर्भातील अकोट बाजार समितीत कापसाला १३ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला होता. आता सेलू बाजार समितीतील दराने कापूस दराचे विक्रम मोडीत काढले.

3. आर्थिक आणि राजकीय संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताने ६५ हजार टन युरिया द्यायचं कबूल केलंय. भारताच्या या निर्णयामुळं श्रीलंकेला(Sri Lanka भात लागवडीसाठी मदत होणारे. भात लागवडीसाठी श्रीलंकेला युरियाची टंचाई भासतेय. त्यामुळे भारतानं शेजारधर्म म्हणून श्रीलंकेला मदतीचा हात दिलाय. श्रीलंकेचे दिल्लीतील उच्चायुक्त मिलिंद मार्गोडा आणि केंद्रीय खत मंत्रालयाचे सचिव राजेश कुमार चतुर्वेदी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर भारताने श्रीलंकेला ६५ हजार टन युरिया देण्याचा निर्णय घेतलाय. भारताकडून हा युरिया लवकरच श्रीलंकेत रवाना होईल, असं चतुर्वेदी यांनी सांगितलं. यापुर्वीच भारतानं श्रीलंकेला ३.५ अब्ज डाॅलरची मदत केलीये.

4. मानवी वापरायोग्य नसलेल्या धान्यापासून होणारी इथेनॉल निर्मिती महागणारे. तेल विपणन कंपन्यांना हे इथेनॉल(Ethanol) प्रतिलिटर २ ते ४ रुपयांनी महाग मिळण्याची शक्यताये. धान्यापासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या आसवानी प्रकल्पांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या. त्यामुळं सरकार या इथेनाॅलच्या दरात वाढ करण्याची शक्यताये. तसचं सरकारनं त्यासाठी संमती दिली असल्याचंही समजतय. सध्या धान्यापासून निर्मिती होणाऱ्या इथेनाॅलला प्रतिलिटर ५२.९२ रुपये दर मिळतोय. त्यात पुन्हा २ ते ४ रुपयांची वाढ होण्याची शक्यताये.

fodder
केंद्र सरकारकडून गहू निर्यातीवर बंदी

5. देशात पशुधानाच्या चाऱ्याचा (fodder)प्रश्न गंभीर होत चाललाय. चराई क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असल्यानं चारा कमी मिळतोय. दुष्काळी वर्षांत ही स्थिती आणखी बिकट बनते. त्यामुळं पशुधानाला पुरेसा चारा पुरविण्यासाठी धोरण गरजेचं झालंय. दरवर्षी उन्हाळ्यात चाऱ्याचे दर गगणाला भीडतात. त्यामुळं दूध उत्पादनाचा खर्च वाढतो. चालू उन्हाळ्यातही याचा अनुभव देशभरात येतोय. राज्यातही पशुखाद्यासह चाऱ्याचे दर दीड ते दोन पटींनी वाढले. बऱ्याच शेतकऱ्यांना हा खर्च परवड नाही. त्यामुळं दुधाचं उत्पादनही कमी झालं. यावर उपाय शोधण्यासाठी हरियाणा सरकारनं (Government of Haryana)चारा लागवड वाढीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा निर्णय घेतलाय. त्यासाठी 'चारा बिजाई योजनेची' राबविण्यात येणारे. हरियाणा सरकारनं नुकतचं या योजनेची घोषणा केलीये. हरियाणात भटक्या गुरांची मोठी समस्याये. या गुरांसाठी राज्य सरकारतर्फे गोशाळा(Goshala) बांधण्यात आल्या. २०१७ साली हरियाणात १७५ गोशाळा होत्या. २०२२ मध्ये राज्यातील गोशाळांची संख्या ६०० च्यावर गेलीये. एप्रिल महिन्यात राज्य सरकारनं या गोशाळांना चारा खरेदीसाठी १३.४४ कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र चाऱ्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढलीये. या चारा टंचाईवर मात करण्यासाठी सरकारने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. गोशाळांना चारा पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना लागवडीसाठी एकरी १० हजारांची आर्थिक मदत देणारे. हे पैसे थेट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात येतील. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त १० एकरवर लागवडीसाठी ही मदत मिळणारे. असं हरियाणाचे कृषीमंत्री जे. पी. दलाल यांनी सांगितलंय. तसच या गोशाळांमधील शेणखताचा उपयोग शेतांमध्ये केला जाणारे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.