Pdkv, Akola : शेतकऱ्यांनी दिले उत्पन्न वाढीचे सूत्र

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात चर्चासत्राचे आयोजन
PDKV AKOLA
PDKV AKOLA Agrowon

अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात (agricultural exhibition) पहिल्या दिवशी झालेल्या चर्चासत्रात प्रयोगशील, उद्योजक शेतकऱ्यांनी उद्यमशिलता, उत्पन्न वाढीचे सूत्र दिले. काळानुरूप बदल स्वीकारत, मागणी असलेल्या बाबींचा अंगिकार करून शेती, शेतीपूरक व्यवसाय केला तर तोटा येत नाही, हे आपल्या मार्गदर्शनात पटवून दिले.

PDKV AKOLA
PDKV Crop Verity : ‘पंदेकृवि’च्या तीन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

बदल स्वीकारला ः मोहन जगताप
फळबाग, बीजोत्पादन व कृषीपर्यटन या विषयावर बोलताना वळती (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील शेतकरी मोहन जगताप यांनी त्यांच्या प्रगतीचा आलेख शेतकऱ्यांसमोर मांडला. पर्यावरणपूरक विषमुक्त शेतीचे आदर्श असे मॉडेल म्हणजे जादू फार्म असे सांगितले. वडील तेजराव जगताप हे अकोला शासकीय कृषी महाविद्यालयातून १९७० ला कृषी पदवी पास झाले. त्यानंतर त्यांनी १९७२ ला सोयाबीन लागवडीचा प्रयोग केला. १९७४ ते ७५ ला अश्वगंधा आणि सर्पगंधा या वनौषधीची लागवड केली. आजोबा त्र्यंबकराव जगताप यांनी हरीतक्रांतीच्या वेळेस शेतात पेपेन, फुलशेतीचे प्रयोग केले. नवशेतीचे हेच बाळकडू आपल्यात आल्याने पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यावर पारंपरिक शेती न करता विविध फळबागा, वेगवेगळ्या अंतरावर लागवड केली. यासाठी बुलडाणा कृषी विज्ञान केंद्र, चिखली कृषी विभागाने चांगले सहकार्य केले, असेही जगताप यांनी सांगितले.

PDKV AKOLA
Akola ZP : राष्ट्रपतींच्या हस्ते अकोला जिल्हा परिषदेला पुरस्कार

कुक्कुट पालनाची सुरुवात मांसल पक्ष्यांपासून करा ः मेटकर
कुक्कुटपालन व्यवसायात यशस्वी घौडदोड करणारे अमरावती येथील रवींद्र मेटकर यांनी आपल्या अनुभव  मांडले. नव्याने या उद्योगात उतरणाऱ्यांनी त्यांची सुरुवात ही मांसल पक्ष्यांपासून करावी. सुरुवातीला कंपनीसोबत करार करून व्यवसाय करावा. व्यवसायात आपण स्वतः काम करणे, व्यवस्थापन सांभाळणे गरजेचे राहते. पोल्ट्रीसाठी शेड उभारताना ते पूर्व-पश्चिम असे करावे. कमीत कमी ५००० पक्ष्यांपासून सुरुवात केली पाहिजे. पक्षी हे स्वतःच्या पोल्ट्री फार्मवर तयार करावेत. या उद्योगात सर्वात मोठा खर्च हा खाद्यावर होतो. जर स्वतः पोल्ट्रीसाठीचे खाद्य तयार केले तर थोडीफार बचत होते, असेही ते म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com