भारत, पाकिस्तानात उष्णतेची लाट हवामान बदलामुळे नाही

पूर्णपणे हवामान बदलाशी संबंध जोडणे ठरेल घाईचे
Heat Wave
Heat WaveAgrowon

संयुक्त राष्ट्र संघ (वृत्तसंस्था) ः भारताच्या अनेक भागांसह पाकिस्तानातही सध्या तापमानवाढीमुळ (High Temperature) नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेच्या झळा (Heat Wave) असह्य होत असल्या तरी दोन्ही देशांतील उष्णतेच्या लाटेचा संबंध इतक्यातच पूर्णपणे हवामान बदलाशी जोडणे घाईचे ठरेल, असे मत संयुक्त राष्ट्र संघाच्या हवामानाशी संबंधित खास संस्थेच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हे बदल हवामान बदलाशी सुसंगतच असून हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलामुळेच पूर्वीपेक्षा उष्णतेच्या लाटांना काहीशी लवकरच सुरू होत असल्याचे या तज्ज्ञांनी म्हटले आहे.

तीव्र उन्हाळ्याचा अनुभव जगातील लोकसंख्येची घनता सर्वाधिक असलेल्या भारत आणि पाकिस्तानातील अनेक भागांत सध्या शेकडो दशलक्ष नागरिक घेत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार भारतातील अनेक भागांत गुरुवारी (ता. २८) कमाल तापमान ४३ ते ४६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले गेले. विभागाच्या म्हणण्यानुसार उष्णतेच्या या तीव्र झळा सोमवारपर्यंत (ता. २ मे) कायम राहण्याची शक्यता आहे, असे जागतिक हवामान संस्थेच्या (डब्ल्यूएमओ) वतीने सांगण्यात आले.

पाकिस्तानच्या अनेक भागांत दिवसाच्या सामान्य तापमानात ५ ते ८ अंशांनी वाढ झाली आहे. या तीव्र झळांनी दोन्ही देशांतील नागरिक हैराण झाले असले तरी या उष्णतेच्या लाटांचा संबंध पूर्णपणे हवामान बदलाशी जोडणे घाईचे ठरेल, असे डब्ल्यूएमओने म्हटले आहे. तथापि सातत्याने होणारे हे बदल हवामान बदलाशी सुसंगतच आहेत. सध्या पूर्वीच्या तुलनेत उष्णतेच्या लाटांना लवकरच सुरुवात होत असल्याचे डब्ल्यूएमओने म्हटले आहे. दोन्ही देशांतील हवामान विभाग आणि हायड्रोलॉजिकल विभाग हे आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन संस्थांच्या सोबत काम करत असून उष्णतेमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या काही वर्षांत अनेक लोकांचे जीव वाचण्यास मदत झाली आहे.

अर्थव्यवस्थेतील प्रमुख घटकांवरही परिणाम

उष्णतेच्या लाटांचे परिणाम केवळ मनुष्य प्राण्यांच्या आरोग्यावरच होत नाहीत तर देशाची अर्थव्यवस्था, कृषी, पाणी आणि वीज पुरवठ्याबरोबरच अर्थव्यवस्थेतील प्रमुख घटकांवरही होतो. समाजाला असलेले धोके अधोरेखित करतानाच या धोक्यांपासून वाचण्यासाठी सर्वाधिक असुरक्षित घटकांपर्यंत अनेक धोक्यांचे इशारे या संस्थांद्वारे पोहोचवण्यासाठी संस्था कटिबद्ध आहेत, असे डब्ल्यूएमओने म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com