Election Commission : शिवसेना ठाकरे गटाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

शिवसेना ठाकरे गटाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. निवडणूक आयोगाला अंतिम निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Election Commission
Election CommissionAgrowon

दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. निवडणूक (Election Commission) आयोगाला अंतिम निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धनुष्यबाणासाठी शिवसेना ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. दिल्ली हायकोर्टाने यासंबंधी काही आदेश दिलेले आहेत.

Election Commission
Grampanchayat Election : नवापूर तालुक्यात १५ ग्रामपंचायतींत १० उपसरपंच बिनविरोध

पक्ष चिन्ह गोठवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने घाईघाईने निर्णय घेतला. निर्णय घेताना नियमांचे पालन केले नाही. पोटनिवडणुकीसाठी आयोगाने हा निर्णय घेतला होता. निवडणूक झाल्याने चिन्हाचा निर्णय पूर्ववत करावा, असे ठाकरे गटाचे म्हणणे होते.

सर्वोच्च न्यायालयात आव्हान

दरम्यान, तातडीने या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गट आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. या निर्णयाला शिससेना ठाकरे गट आव्हान देणार आहे. यामुळे आता पुढचा सत्तासंघर्ष कशा पद्धतीने होईल, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com