Grape Crop : द्राक्ष बागेत इथेफॉन वापरातील अडथळा संपला

द्राक्ष संशोधन केंद्रात लेबल क्लेमसंदर्भात माहिती तयार करण्याचे काम सुरू
Grape Crop
Grape CropAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः द्राक्षवेलींमध्ये (Grape Vine) चांगली फूल व फळधारणा होण्यासाठी पानगळ व्यवस्थितपणे होणे गरजेचे असते. त्यासाठी विविध पद्धती असल्या, तरी रसायनांच्या वापरामध्ये इथेफॉन (३९ टक्के एसएल) अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

मात्र आजवर त्याला लेबल क्लेम (Lable claim) नसल्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारासमोर समस्या निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेता भारत सरकारच्या केंद्रीय कीटकनाशक बोर्ड व नोंदणीकरण समिती (सीआयबी-आरसी) यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये या रसायनाच्या लेबल क्लेमसंदर्भात आवश्यक तो सर्व माहितीसाठी (डेटाबेस) तयार करण्याचे काम सुरू आहे.

Grape Crop
Grape Management : द्राक्ष बागेत फुलोरा, सेटिंग अवस्थेत घ्यायची काळजी

इथेफॉन संदर्भातील हा मुद्दा भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या उपमहासंचालक डॉ. अनंतकुमार सिंग यांनी इथेफॉनच्या संबंधित माहितीसाठ्यासह केंद्रीय कीटकनाशक बोर्ड व नोंदणीकरण समितीच्या सोमवारी (ता. १६) झालेल्या ४४४ व्या नोंदणी समितीच्या बैठकीमध्ये मांडला होता.

या बैठकीमध्ये इथेफॉन (३९ टक्के एसएल) वापरासंदर्भातील प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या रसायनाची नोंदणीही करण्यात आल्यामुळे इथेफॉन वापरामध्ये सातत्याने बागायतदारांना सतावणारा अडथळा दूर झाला आहे.

Grape Crop
Grape Management : द्राक्ष बागेत कलम करण्याची योग्य वेळ

या नोंदणी समितीने लेबल आणि माहिती पत्रकामध्ये ‘‘हे उत्पादन जलीय जीव व मासे यांच्यासाठी अत्यंत विषारी आहे, त्यामुळे याचा वापर हा मत्स्यपालनाच्या ठिकाणी व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात टाळला पाहिजे’’ हे सावधगिरीचे विधान असावे, ही सूचना केली आहे.


पानगळीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या इथेफॉन (३९ टक्के एसएल) या रसायनाला द्राक्ष बागेतील वापरासाठी लेबल क्लेम नसल्यामुळे बागायतदारांना अडचणी येत होत्या.

आता या रसायनाला लेबल क्लेम मिळाल्यामुळे आगामी हंगामातील द्राक्ष उत्पादनामध्ये गुणवत्ता व निर्यात वाढीमध्ये अत्यंत फायद्याचे ठरणार आहे.
- डॉ. कौशिक बॅनर्जी, संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com