top 5 news -पामतेल दरवाढ कायम राहण्याचे कारण काय?

इंडोनेशियाने १९ मे रोजी पामतेल निर्यातबंदी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं पामतलेचे दर कमी होईल, असे वाटत होते.
top 5 news -पामतेल दरवाढ कायम राहण्याचे कारण काय?
palm oil agrowon

1. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ पिकांची लागवड ५.१ टक्क्यांची वाढलीये. केंद्रीय कृषी मंत्रालयानुसार शुक्रवारपर्यंत ७६ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळ पिकांची लागवड करण्यात आलीये. यंदा भात आणि भुईमूग वगळता अन्य प्रमुख पिकांच्या लागवडीत वाढ झालीये.भातीची लागवड ३.३ टक्क्यांनी घटून ३० लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली. तर तेलबिया लागवडीखालील क्षेत्र २.२ टक्क्यांनी वाढून ११ लाख १७ हजार हेक्टरवर पोचलं. तृणधान्य लागवडही ९.६ टक्क्यांनी वाढली, एकूण ११ लाख ८६ हजार हेक्टरवर क्षेतृणधान्या पिके होती. मक्याची पेरणी मात्र २.५ टक्क्यांनी घटलीये. केवळ ७ लाख ३६ हजार हेक्टरवर मका होता.

2. आंतराराष्ट्रीय बाजारात गव्हाचे दर वाढतायेत. जगभरात गव्हाचे दर वाढत असताना भारतातही त्याचे पडसाद उमटणं स्वाभाविकये. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक घडामोडीपासून अलिप्त राहू शकत नाही, असं सांगत निती आयोगानं गव्हाच्या दरवाढीची कारणे सांगितली. गेल्या वर्षभरात आंतराराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या(wheat) दरात ३० ते ४० टक्क्यांची वाढ झालीये. तर भारतात केवळ ६ ते ७ टक्क्यांनी दर वाढले. गव्हाचं १ हजार ११० लाख टन उत्पादन होऊनही गव्हाचे दर वाढतायेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि देशांतर्गत बाजारातील परस्पर संबंधांमुळे हे घडणं साहजिक असल्याचं निती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी सांगितलं.

palm oil
देशांतर्गत बाजारात गव्हाची दरवाढ स्वाभाविक; निती आयोग

3. यंदा उत्तर महाराष्ट्रात २ लाख ६५ हजार हेक्टरवर उन्हाळी कांदा(Onion) लागवडी होत्या. मागील वर्षीच्या तुलनेत ७३ हजार हेक्टरनं यंदा लागवड वाढली. त्यामुळं विक्रमी उत्पादन होईल, असा अंदाज होता. मात्र नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांत उत्पादनावर परिणाम दिसून येतोय. एकरी उत्पादनात नाशिक व धुळे जिल्ह्यात ३० टक्क्यांपासून ते ५० टक्क्यांवर उत्पादन घटल्याचे वास्तव समोर आलंय. उत्पादन व उत्पन्नाचं गणित बिघडल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. सध्या शेतकरी कांदा विकत असले तरी उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळत आहेत. नीचांकी ४० रुपये, तर सरासरी ८७५ रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळतोय. यातून उत्पादनाचा खर्चाही भरून निघत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं

4. रुपयाचं अवमूल्यन झाल्यामुळं तुकडा तांदळाच्या किंमतीत ३ टक्क्यांची घसरण झालीये. भातापासून तांदूळ बनवण्याच्या प्रक्रियेतून तुकडा तांदूळ(Rice) तयार होत असतो. प्रक्रिया होत असताना प्रति क्विंटल भातपिकापासून १० टक्के तुकडा तांदूळ मिळतो. चीन, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया यादेशात भारतीय तुकडा तांदळाला चांगली मागणीये. कारण त्या देशांत तुकडा तांदळाचा पशुखाद्य आणि नूडल्ससाठी वापर केला जातो. सेनेगलसारख्या आफ्रिकन देशात तुकडा तांदळाचा वापर अन्न म्हणून होतो. उलट निर्यातखर्च वाढलाय. आजघडीस वाहतूक खर्चासह तुकडा तांदळाची किंमत ३३० डॉलर्स प्रति टनये. गेल्यावर्षी ती २७० ते ३०० डॉलर्स दरम्यान होती. त्यामुळं यंदा मागणी असूनही निर्यातीत अडथळे येतायेत.

5. इंडोनेशिया पामतेल निर्यातबंदी केल्यानंतर जागतीक बाजारात मोठी तेजी आली होती. मात्र इंडोनेशियाने पामतेल निर्यातबंदी मागे घेतल्यानंतरही दर फारसे कमी झाले नाहीत. १९ मे रोजी इंडोनेशियाने पामतेल निर्यातबंदी(Export ban) मागे घेण्यााच निर्णय घेतला होता.परंतु १९ मे पासून आत्तापर्यंत पामतेलाचे दर बुर्सा मलेशिया डेरिव्हेटीव्सवर ४.५ टक्क्यांनी वाढलेत. खरं तर पामतेल निर्यात सुरळीत झाल्यानंतर दर कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र असं झालं नाही. पामतेल बाजारात अद्यापही स्पष्टता नाही. बाजारातील चित्र समोर आल्यानंतरच दर कुठे स्थिरावतील हे सांगता येईल, असं व्यापारी सुत्रांनी सांगितलं. इंडोनेशियाने पामतेलाच्या मोठ्या खरेदीवरील अनुदान ३१ मे पासून रद्द करण्याचं ठरवलंय. त्याऐवजी येथील सरकार किंमतीवर निर्बंध आणू शकते. तसेच पामतेल निर्यात सुरु असली तरी किती पामतेल उपलब्ध होईल, याबाबत आयातदार शाशंक आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांना सध्या तरी १० लाख टनांच्या दरम्यान तेल उपलब्ध होण्याची शक्यताये. मात्र निर्यात(Export) सुरु होऊनही दर वाढल्याने, बाजारात चिंतेचं वातवरणये. बुर्सा मलेशिया डेरिव्हेटीव्सवर पामतेलाचे व्यवहार शुक्रवारी ६ हजार ३५१ रिंगीटवर बंद झाले. म्हणजेच १४५० डाॅलर प्रतिटनाने व्यवहार झाले. रिंगीट हे मलेशियाचं चलनये. १९ मे रोजी हाच दर ६ हजार ९४ रिंगीट म्हणजेच १३९१ डाॅलर प्रतिटनांवर होते. पुरवठा वाढीची शक्यता असूनही दर वाढल्यानं पामतेल बाजारात चिंतेचं वातावरणये. याचा थेट परिणाम ग्राहकांवर होऊ शकतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com